Thursday, 27 September 2018

Easy omlet ( सोपे ऑम्लेट )




साहित्य : २ अंडी ,१/२ टीस्पून लालतिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, तेल.


कृती : तवा गॅसवर ठेऊन गॅस पेटवून घ्या.तवा  गरम होईपर्यन्त एका वाटीत एक चमचा पाणी घ्या त्यात लालतिखट हळद व चविनुसार मीठ घालून मिक्स करा नंतर अंडी फोडून टाका व फेटून घ्या .तव्यावर तेल टाकुन फेटलेले अंड्याचे मिश्रण तेलावर पसरून टाका.खालची बाजू भाजली की ऑम्लेट पलटून घ्या.बस्स पाच मिनिटात ऑम्लेट तयार होईल.हे ऑम्लेट लहान मुलांना खुप आवडेल कारण ह्यात कांदा मिरची असे  मुलांना न आवडणारे काहीच नाही.टेस्टी व चवपन चांगली लागते.
टिप्स : अंडी फेटण्या अगोदर पाणी टाकल्यास चटणी मीठ ऑम्लेटला यवस्थित लागते गुठळ्या होत नाहीत.

Home made mutton sukka ( घरगुती मटण सुक्का )



साहित्य :  ५००ग्राम मटण, १ कांदा  बारीक चिरलेला, अद्रक लसणाची पेस्ट २ चमचा, १ चमचा लालतिखट,१/२ चमचा हळद, १ चमचा काळा मसाला, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा जिरेपूड, १ चमचा गरम मसाला, १ ते २ चमचा भाजून कुटलेला खोबरा, असेल तर  तंदुरी मसाला १ चमचा, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल.


कृती :  सर्वात अगोदर मटण  लिंबू व मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. नंतर गॅसवर कढईत तेल घालून अद्रक लसणाची पेस्ट घालून फोडणी करून त्यात मटण टाका नंतर हळद व मीठ घाला आणि पाणी घालून मटण नरम शिजवुन घ्या.त्यानंतर शिजलेल्या मटणामधील पाणी  काढून घ्या. हे पाणी ग्रेव्हीसाठी उपयोगात आणले जाते. या नंतर दुसऱ्या कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे नंतर कांदा घालून परतावे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाका. गॅस  कमी करून लालतिखट, हळद,काळा मसाला,, बारीक  केलेला खोबरा, गरम मसाला धणेपूड, जिरेपूड,तंदुरी मसाला घाला मिक्स करा  नंतर मटण घाला चवीनुसार मीठ  व कोथिंबीर घाला.छान परतवून घ्या. बस्स झालं तयार मटण सुक्का मस्त टेस्टी लागते एकदा तरी करून पाहा.

Thursday, 20 September 2018

Two in one chana dal ( चणा डाळ )





साहित्य:  ५ ते ६ भिजत घालेली चणा डाळ,१ टमाटर, १ कांदा, १ ते २ चमचा लसूण कोथिंबीर जिरे एकत्र कूटलेले ,कढीपत्ता, १  चमचा लालतिखट, १/२ चमचा हळद,  १चमचा  धणेपूड ,१ चमचा जिरेपूड,१ चमचा काळा मसाला , १  चमचा जिरेमोहरी, चवीनुसार मीठ, व तेल.

कृती : गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून तडतडू द्या.नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. नंतर लसणाची  पेस्ट व कढीपत्ता टाकून परतून घ्यावे गॅस कमी करून लालतिखट, हळद, बारीक चिरलेला टमाटर घाला. छान परतवून घ्या.त्यानंतर भिजलेली चणा डाळ घाला नंतर धणेपूड, जिरेपूड, काळा मसाला चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. डाळ बुडेपर्यंत पाणी घालून शिजू द्यावे. पूर्ण पाणी    आटेपर्यंत शिजवुन घ्या.ही डाळ एकदम नरम शिजवायची नाही.वरतून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. ही डाळ आपण नवरात्री मध्ये प्रसाद म्हणून करू शकतो. आणि भाजी म्हणून पण खाऊ शकतो.म्हणून हिला मी two in one डाळ म्हणते तर तूम्ही काय  म्हणाल!

Tuesday, 18 September 2018

Veg Party Starter Potato Lollipop( पोटॅटो लॉलीपॉप )







साहित्य : उकडून कुस्करलेले २ आलू, १ मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा , १/२ कप ब्रेड क्रम्स,  १छोटा चमचा लालतिखट, १ चमचा धणेपूड, १ चमचा अद्रक लसन पेस्ट, १/२ चमचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मैदा १ ते २ चमचा लॉलीपॉप  बुडून तळण्यासाठी, तेल तळण्यासाठी .



कृती : आलू, ब्रेड क्रम्स,लालतिखट, धणेपूड, कांदा, अदरक लसन पेस्ट, आमचूर पावडर,कोथिंबीर,चवीनुसार मीठ घालून मिक्स करून गोळा बनवून बाजूला ठेवून द्या. एका वाटीत मैदा घेऊन थोडे पाणी घालून  पातळ पेस्ट करून घ्या. नंतर हाताला तेल लावून  आलूच्या मिश्रणाचा गोळा घेऊन गुलाब जामून
सारखे गोळे बनवून घ्या.गॅसवर तेल गरम करून त्यात बनवलेले गोळे मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळून हातावर घेऊन गोल आकार देने की जणेकरून ब्रेड क्रम्स निघणार नाहीत .अश्याप्रकारे एक एक गोळा बनून तेलात सोडा. आणि सोनेरी रंगावर तळून घ्या. व मेओनीज किंवा टमाटो सॉस सोबत स्टार्टटर म्हणून सर्व्ह करा .टेस्टी पोटॅटो लॉलीपॉप  तयार  आहेत.

Cheesy Potato smiley (बटाट्याच्या स्मायली)





साहित्य: ३ उकडलेले आलू,  २ ब्रेड  , कॉर्न फ्लॉवर ३ मोठे चमचा, २५ ग्राम चीज ( १ तुकडा) , चवीनुसार मीठ ,तळण्यासाठी तेल. 


कृती:   ब्रेडची काठ ( कडा)काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.एका टोपल्यात ब्रेडचा चुरा व चिज किसून टाका चीज जास्त टाकू नका जास्त टाकल्यास तेलात  वितळू शकते नंतर किसलेले आलू टाका . कॉर्न फ्लॉवर चवीनुसार मिठ टाका मिक्स करून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर काळीमिरी पावडर टाकू शकता. पण मुलांसाठी असेच छान लागते. नंतर एक प्लेट घेऊन त्यात एक चमचा तेल टाकून तयार केलेले आलूचे मिश्रण एकजीव करावे. मळलेले आलूचे मिश्रण हवा बंद डब्यात ठेऊन पंधरा ते वीस मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. पंधरा ते वीस मिनिटानंतर   ताटावर एका पॉलिथिनवर तयार केलेल्या  मिश्रणामधून अर्ध्या  गोळा ठेऊन त्यावर अजून एक पॉलिथिन ठेवा आणि लाटण्याच्या मदतीने जाडसर  मोठी पोळी लाटून घ्या. वरची पॉलिथिन काढून टाका व पाणी पुरी सारख्या पुऱ्या कटरच्या मदतीने पाडून घ्या.नंतर त्या पुरीला स्मायली चेहरा तयार करा. तयार झालेल्या स्मायली पुऱ्या एका प्लेटवर काढून वीस मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात एक एक करून स्मायली पुरी टाका आणि मीडियम गॅसवर तळून घ्या. पुऱ्या तळतेवेळलेस एकमेकांना चिटकणार नाही म्हणून काटा चमचे अधून मधून हलवत राहा. साधारण तपकिरी रंग येई पर्यंत तळून घ्या.


टिप्स: स्मायलीज पुरी हवा बंद डब्यात ठेऊन. जेंव्हा तुम्हाला पाहिजे तेंव्हा तळून घ्या. तुमचा वेळ वाचेल आणि स्मायलीज झटपट बनतील.

Monday, 17 September 2018

Kakdiche dhapate ( काकडीचे धपाटे )



साहित्य : २ वाट्या बेसन, १ वाटी गव्हाचे  पीठ, १/२ वाटी ज्वारीचे पीठ, १ किसलेली काकडी,   २ चमचा लसणाची पेस्ट, १चमच लालतिखट, १/२चम्मच हळद, १ चमचा  जिरेपूड, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ व तेल.

कृती : बेसनात गव्हाचे  पीठ, ज्वारीचे पीठ ,किसलेली काकडी, लसणाची पेस्ट, लालतिखट, हळद,जिरेपूड मीठ, कोथिंबीर २ चमचा तेल टाकून मिक्स करा. नंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. चपाती प्रमाणे धपाटे लाटून घ्या. गॅस चालू करून तवा ठेवा व धपाटे तेल लावून छान भाजून घ्या. धपाटे दही,सॉस,चटणी, कशाही सोबत छान लागतात.

Easy Coconut chatni ( सोपी ओल्या नारळाची चटणी )






साहित्य : १ नारळ किसून घेतलेला, १ वाटी दही ( दही जास्त आंबट नको )  ४ते५ हिरवी मिरची, फोडणीसाठी जिरेमोहरी ,कढीपत्ता, तेल व चवीप्रमाणे मीठ.


कृती :  किसलेला ओला नारळ एका भांड्यात घेऊन त्यामध्ये व मीठ मिक्स करावे. नंतर फोडणीसाठी गॅस चालू करून पातेल्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर जिरेमोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरचीचे तुकडे टाका व कढीपत्ता टाका मिरची  व गॅस बंद करून तयार झालेली फोडणी  नारळाच्या मिश्रणात टाका . नारळाची चटणी तयार कोशिंबीर पेक्षाही ही चटणी बनवायला वेळ कमी लागतो. फक्त नारळ अगोदर किसून ठेवावा.

टिप्स: नारळ फोडून  फ्रिजमध्ये ठेवल्याने खोबरं हे नारळाच्या कवटी पासून वेगळे करण्यास सोपे जाते.

Sunday, 16 September 2018

Idli chatani ( इडली चटणी )







साहित्य :  १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी दाळवे ,४ ते५ हिरवी मिरची,  २ते४बदाम ,१ चमचा जिरेमोहरी, कढीपत्ता, चवीनुसार मीठ.


कृती : शेंगदाणे थोड्या तेलात  छान भाजून घेणे .थंड झाल्यावर मिक्सरमध्ये शेंगदाणे व दाळवे आणि बदाम  थोडे बारीक करून नंतर त्यामध्ये पाणी घालून एकदम मस्त बारीक पेस्ट तयार करून घ्या.  पातेल्यात शेंगदाण्याची पेस्ट काढा . तूम्हाला चटणी जशी हवी तसे पाणी घाला म्हणजे घट्ट पाहिजे असल्यास कमी पाणी पातळ हवी असल्यास जास्त पाणी घाला नंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. आता तडका तयार करूया  गॅसवर एका पातेल्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून तडतडल्यावर गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्ता टाका.  हिरवी मिरची भाजून झाल्यावर शेंगदाण्याच्या मिश्रणात तडका टाकून छान मिक्स करा.

Vitaminyukt moogache dose (पौष्टीक हिरव्या मुगाचे डोसे )





साहित्य: २ वाट्या हिरवेमुग, १ वाटी तांदूळ, १ कांदा, ३ते ४ हिरवी मिरची, ५ते ६लसूण पाकळ्या, ४ ते ५ कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर.


कृती: हिरवेमुग व तांदूळ  पाच ते सहा तास पाण्यात भिजत घालावे. पाच ते सहा तासानंतर त्यातील पाणी पूर्ण काढून टाकावे. आणि मिक्सर मध्ये मूग व तांदळाची मऊसर पेस्ट करून घ्यावी. मग कांदा, मिरची,लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घ्या. किंवा तुम्ही मूग व तांदळा सोबतच मिक्सरमध्ये बारीक करू शकता. नंतर त्यात चवीनुसार मीठ  व थोडे पाणी घालून डोश्याप्रमाणे मिश्रण तयार करावे. गॅस चालू करून नॉनस्टिकी तव्यावर डोस्याप्रमाणे  दोषे करून घ्या . एरवी लहान मुलांसोबत मोठेही कढीपत्ता कांदा कोथिंबीर हे खात नाहीत पण असे केल्यामुळे सर्व खाल्ल्या जाते आणि हिरवेमुग तर शरीराला पौष्टीक आहेतच मग आहेत न पौष्टीक डोसे चला मग पहा तर करून हे डोसे सॉस चटणी, नाहीतर आपली इडलीची शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता.

Saturday, 15 September 2018

School tiffin in only five minit ( पाच मिनिटात मुलांचा डब्बा नमकीन वाटाणे )






साहित्य:  २ वाट्या वाटाणे, १ चमचा जिरे मोहरी, २ टेबल स्पून तेल,१/२ चमचा हळद, 


कृती: वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले.  गॅस चालू करून कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून चांगली तडतडल्यावर भिजवलेले वाटाणे घाला नंतर हळद चवीनुसार मीठ घालावे. अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या काढाव्यात. कुकरची वाफ गेल्यावर कुकर उघडा जर थोडे पाणी असेल तर कुकरचे झाकण न लावता पाणी आटवून घ्या .जर पाणी नसेल तर उत्तमच बस्स टिफिन रेडी अगदी मुलांना तयार करतच तुम्ही बनवू शकता फक्त फोडणी घातली की झाले काम.

Home made shrikhand (घरगुती श्रीखंड )







साहित्य: १/२ लिटर दही( चक्का दही), १ वाटी  पिठी साखर,  विलायचीपूड,  आवडीनुसार काजू,बदाम, पिस्ता,
 
कृती:  दही एका कॉटनच्या कपड्यात पोटली बांधून रात्रभर टांगून ठेवा. त्यामुळे दह्यातील सर्व पाणी निघून जाईल. मग तयार झालेला दह्याचा गोळा  व पिठी साखर वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये पाच ते सहा मिनिटे फिरून  घ्या. तुम्हाला काजू, बदाम ,पिस्ता बारीक कापून आवडत असल्यास बारीक कापून किंवा मिक्सरमधून बारीक करून टाका छान मिक्स करून हवा बंद डब्ब्यात काढून चार पाच तास फ्रिजमध्ये थंड ( घट्ट ) होण्यासाठी ठेवा. थंडगार श्रीखंड तयार खूप छान अगदी बाहेरच्या श्रीखंड सारखीच चव लागते बाहेरून आणलेले मोजकेच खावे लागते. पण आपण घरी बनवलेले मनसोक्त खाऊ शकतो.
टिप्स: साखर आपल्या आवडीनुसार घाला पण जास्त घातल्यास श्रीखंड पातळ होण्याची भीती असते म्हणून पाणी काढून जेवढा दह्याचा गोळा असेल तेवढीच साखर घेणे.

#shrikhand recipe in marathi #shrikhand recipe #amul Shrikhand #chitle shrikhand

Friday, 14 September 2018

Instant ganpaticha prasad( अगदी काही मिनिटात तयार होणार प्रसाद)






साहित्य: २ वाट्या खवा, २ वाट्या साखर, ३ वाट्या खोबऱ्याचा किस, वेलचीपूड. बस्स एवढेच.


कृती: गॅसवर कढईत खवा टाकून थोडा परतून घ्या .मग त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून मिक्स करावे चमच्याने सतत हलवत रहावे. नंतर साखर व वेलचीपूड घालून पाच ते दहा मिनिटे भाजून घ्या. आणि गॅस बंद करू प्रसाद एका भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली काजू  बदामाचे काप भुरभरावे अगदी कमी वेळात टेस्टी असा प्रसाद तयार होईल.आणि तुमचा वेळ पण वाचेल.

QUick paneer 65 ( दहा मिनिटात बनवा पनीर६५)








 साहित्य: २५० ग्राम पनीर, २ते३ चमचा मैदा, चिंग मचूनरीयन मसाला १ पाकीट, तेल ,२ ते३ लसणाच्या पाकळ्या, १/२इंच अद्रक, २ते ३ हिरवी मिरची.

 कृती:  पनीरचे सारख्या आकाराचे तुकडे करून घ्या,त्यावर मैदा टाकून मिक्स करून घ्या .मैदा प्रत्येक पनीरचे तुकड्याला लागला पाहिजे.गॅसवर कढईत तेल तापवायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे घालून तळून घ्या.नंतर  एका वाटीत चिंग मंचुरीयन मसाल्याचे थोडे पाणी टाकून मिश्रण तयार करा. दुसऱ्या एका पातेल्यात दोन चमचे तेल घालून लसन,अद्रक,हिरवी मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे टाकून परतून घेऊन त्यामध्ये चिंग मंचुरीयन चे मिश्रण घालून गॅस कमी करा ते मिश्रण घट्ट होत आले की त्यामध्ये पनीरचे तळलेले तुकडे टाका आणि चांगले मिक्स करून घ्या.गरमागरम पनीर ६५ तयार होतील.
टिप्स: एका  छोट्या कॅरीब्याग मध्ये मैदा टाकून पनीरचे  तुकडे टाकून छान हलून घेतल्यास पनीरच्या प्रत्येक तुकड्याला मैदा बरोबर लागतो.

#paneer recipes  #paneer 65 #panner chilli recipe in marathi #panner chilli #paneer #ching paneer chilli

Wednesday, 12 September 2018

Ganpati bappachya avdiche modak ( तळलेले मोदक )





सारणाचे साहित्य:  १ ओला  नारळ किसून घेतलेला, ( जवळपास दोन वाट्या नारळाचा किस ), १ वाटी साखर, १ वाटी खवा, विलायची पूड,आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता 

पारीचे साहित्य: १ वाटी गव्हचे पीठ, १ वाटी मैदा, २ ते ३ चमचा तूप, चमूटभर मीठ.

कृती:  अगोदर सारण बनून घेऊया.त्यासाठी गॅसवर कढईत नारळाचा किस,खवा,साखर,वेलचीपूड काजू, बदाम, पिस्ता, मनुका टाकून बारीक गॅसवर छान भाजून घ्या. जोपर्यंत पातळ झालेली साखर कोरडी होत नाही तोपर्यंत भाजा.गॅस बंद करून सारण थंड होऊ दया.
आत्ता पारीचे पीठ मळून घेऊ या अगोदर एका ताटात गव्हाचे पीठ, मैदा, मीठ एकत्र करून घ्या व  त्यात तूप कडकडीत गरम करून घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पाच मिनिटानंतर पेढ्याएव्हढे गोळे करून पुरी सारखी पारी लाटून घ्या. पारी हातावर घेऊन  चमच्याने सारण भरून हुळू हळू वरच्या बाजूने पारीचे तोंड बंद करा. अश्याप्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावे. आणि मंद (बारीक)  आचेवर( गॅसवर) तळून घ्या.बारीक गॅसवर तळल्यामुळे मोदक आतपर्यंत तळल्या जातील बस्स मोदक तयार झालेली आहेत.
टिप्स: पिठात गरम तूप घातल्यामुळे मोदक खुसखुशीत होतील.

#मोदक रेसिपी #Modak Recipes #मोदक रेसिपी मराठी #modak Recipe marathi #मोदकाचे प्रकार# ganesh modak recipe 

Pakodevali kadhi ( पकोडेवाली कढी )




कढीचे साहित्य: २५०ग्राम दही, २ते ३चमचा बेसन, ( ४ ते ५ हिरवी मिरची, ५ते६ लसूण पाकळ्या, १/२चमचा जिरे, थोडी कोथिंबीर ) या सर्वांची पेस्ट तयार करा मग ती खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये तयार केली तरी चालेल. १ चमचा जिरे मोहरी , १/२ हळद कढीपत्ता चवीनुसार मीठ आणि तेल,.
पकोडयाचे साहित्य: १ ते २ वाट्या बेसन, १ चमचा लसन जिरे एकत्र कुटलेले, एक चुटकी खाण्याचा सोडा, आवडीनुसार लालतिखट चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल.

कृती: कढी बनवण्यासाठी दही व बेसन एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या.आणि मग त्या मध्ये साधारण एक ग्लास पाणी टाकून पातळ मिश्रण  करून घ्या. नंतर गॅसवर पातेलं ठेवून गॅस चालू करा. पातेल्यात तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरची लसणजीरे यांची पेस्ट  टाकून चांगले परतून घ्यावे .कढीपत्ता व हळद  घालून तयार केलेले बेसनदह्याचे मिश्रण घाला . चवीनुसार मिठ घालून एक दोन  उकळी येई पर्यंत चमच्याने हलवत राहा.जनेकरून कढी उतू जाणार नाही याची काळजी घ्या.कढी तयार झाली. गॅस बंद करा .आता पोकोडे बनवुयात एका टोपल्यात बेसन ,सोडा,लालतिखट, लसनजिरेपेस्ट,चवीनुसार मीठ  व पाणी  घालून भज्जीच्या  मिश्रनासारखे  पीठ तयार करून घ्या . कढईत तेल तापल्यावर  नेहमी प्रमाणे भज्जी तळून घ्यावे. आणि कढीत टाकून वरतून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.पकोडे टाकल्यामूळे कढी ची चव काही औरच लागते जरूर ट्राय करा पकोडेवाली कढी.
टिप्स: जर का आपणास कढी घट्ट पाहिजे असल्यास बेसन थोडे जास्त घाला.तसेच कढि खूप आंबट झाल्यास कढी उकलतेवेळेस थोडे पाणी किंवा आवडत असल्यास साखर घालू शकता.

Saturday, 8 September 2018

Quick Khava Rabadi (खवा रबडी)






 साहित्य: १लिटर दुध, २५० ग्राम खवा, १५० ग्राम साखर, वेलचीपूड आवडीनुसार काजू,बदाम,पिस्ता.

कृती: गॅसवर एका पातेल्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध छान उकळू द्या दूध उकल्यानंतर त्यामध्ये खवा घाला .दहा मिनीटे दुधाला चांगल्या पद्धतीने  ढवळत राहा जनेकरून दूध लागणार नाही .म्हणजे करपणार नाही  खव्याच्या गुठळ्या होणार नाही याची  काळजी घ्या.त्यानंतर दुधात साखर घाला.चमच ने सतत हलवत रहा.शेवटी  विलायचीपूड व काजू ,बदाम,पिस्ता उभे कापून दुधात  घाला.  व गॅस बंद करा .सर्व्ह करतेवेळेस वरतून काजू  पिस्ता बदामाचे थोडे काप भुरभुरावे अगदी काही मिनिटाच्या आत  शुद्ध न कोणती भेसळ  न गॅसजवळ तासन तास  उभे राहण्याची गरज घरच्या घरी बनवा यम्मी खवा रबडी.

Rashtriy padarth khichadi ( राष्ट्रीय पदार्थ खिचडी)


 





साहित्य: २ वाट्या तांदूळ , १/२ वाटी भिजवलेले वाटाणे, ५ ते ७ हिरची मिरची, १ कांदा,  १ टमाटर, २ ते ३ चमचअद्रकलसणाची पेस्ट, १/२ चमचा लालतिखट,  १ चमचा  गरम मसाला,१ चमचा काळा मसाला, २ ते ४ तेजपान, १ जिरेमोहरी,  २ते ३ चमच तेल (तेलाच्या कॅटलीतील चमचने तेल घ्यावे ) १ ते २ चमच तूप , कोथिंबीर, चवीनुसार मीठ

कृती: तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. हिरवी मिरची व कांदा उभा कापून घ्या. तसेच टमाटर बारीक चिरून घ्या.  कुकरमध्ये तेल टाका. तेल गरम करून त्यात जिरेमोहरी टाका जिरेमोहरी तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरची टाकून तेजपान टाका त्या नंतर अदरक लसनची पेस्ट टाकून लालसर परतून घ्या.लालतिखट   टमाटर टाकून थोडे परतून घ्या.नंतर त्यात तांदूळ घालून परतून दीड ग्लास पाणी घाला. वरतून गरम मसाला व  काळा मसाला घाला आणि चवीनुसार मीठ  व तूप घाला कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या व कुकरला झाकण लावून तीन शिट्टी होऊ देऊन गॅस बंद करा. कुकरची वाफ  जाऊ  द्या. गरमागरम मसाला खिचडी तयार.
टिप्स:   खिचडी जास्त असल्यास ग्लासचे  पाण्याचे प्रमाण  कमी जास्त होत असल्यास कोणतेही तांदूळ साधा भात असो की खिचडीचे तांदळाच्या  एक ते दीड इंच पाणी  घालावे अगदी कोणालाही समजण्यासारखे प्रमाण आहे.

Matkichi usal ( मटकीची उसळ)




 साहित्य: मोड आलेली मटकी, १ कांदा, १ टमाटर, लसणाची पेस्ट, १ चमचा लालतिखट,१/२ चमचा हळद,  जिरेमोहरी ,कढीपत्ता, कोथिंबीर चवीनुसार मीठ.


कृती:  गॅस चालू करून त्यावर कढईत तेल गरम झाल्या वर तेलात जिरेमोहरी टाकून ती तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या नंतर लसणाची पेस्ट टाका ती पण परतून घ्या. कढीपत्ता घाला मग बारीक चिरलेला टमाटर टाका नंतर लालतिखट, हळद,घालावी छान टमाटर नरम होई पर्यंत परतून घ्यावे. सगळ्यात शेवटी मटकी घालावी छान मिक्स करून वरतून थोडे पाणी घालावे .चवीनुसार मीठ घालून परतावे. पाणी आटे पर्यंत मटकी शिजवुन गॅस बंद करून वरतून कोथिंबीर घालावी. मटकी तयार झाली मुलांना शाळेत डब्यात दया नाहीतर घरी खा.

















Thursday, 6 September 2018

Veg moglai paratha (मोगलाई पराठा)







साहित्य: २ ते ३ बनवून तयार असलेली गव्हाची पोळी(चपाती), बनवलेली बटाट्याची  सुकी भाजी, बारिक चिरलेला १ ते२ कांदा ,१ते2 बारीक चिरलेला टमाटर, बारीक शेव, २ ते३ चमचा बेसन , टमाटर चा सॉस,चीज,लालतिखट, चवीनुसार मीठ.बारीक चिरलेली कोथिंबीर.



कृती: सर्व प्रथम बेसनात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करून घ्या.नंतर पोळीच्या वरच्या बाजूला बटाट्याची भाजी व्यवस्थित लावून त्यावर चमच्याने बेसनाचे   एक ते दोन चमचा मिश्रण टाकून पसरून घ्या.    नॉनस्टिक तव्यावर बेसनाचे मिश्रण  लावलेली पोळी जशास तशी तव्यावर ठेवावी. नंतर गॅस चालू करा . तवा गॅसवर ठेवा आणि तवा गरम झाल्यावर पसरट चमच्याने पोळी पलटून घ्या की जनेकरून  लावलेले बेसन भाजल्या जाईल दोन तीन मिनिटांनी पोळी दुसऱ्या बाजूने पलटून घ्या. नंतर  बटाट्याची भाजी लावलेली बाजू वर येईल त्यावर १चमचा सॉस लावून पसरून। घ्या आणि सॉसवर कांदा, टमाटर  पूर्ण पोळीवर पसरून टाका नंतर त्यावर किसलेले चीज  टाका पोळी थोडावेळ कमी गॅसवर चीज सेट होई पर्यँत ठेवा. पोळी साधारण कडक झाली की तव्यावरून खाली उतरून घ्या. नंतर त्यावर बारीक शेव भुरभुरावी थोडे चीज अजून घालावे.लालतिखट व मीठ घालावे .शेवटी कोथिंबीर घालावी मोगलाई पराठा तयार झाला.पिझ्झा कटरने कापून सर्व्ह करावे. यम्मी मोगलाई पराठा तयार.
टिप्स: ताज्या पोळी ऐवजी शिळी पोळी तसेच शिळी बटाट्याची भाजी चालेल,तुमचा शिळ्या पोळ्यांचा प्रश्न मीट
लाच समजा मग बनवा यम्मी मोगलाई पराठे.

# paratha # Easy paratha recipes #paratha recipe in marathi # paratha recipes in marathi #paratha banane ka tarika 

Wednesday, 5 September 2018

Chiji palak paneer( चिजी पालक पनीर)





साहित्य: १/२ किलो पालक, १पाव (२५० ग्राम) पनीर, २५ ते ५० ग्राम खोबर, १ मीडियम आकाराचा कांदा, अद्रक लसूण पेस्ट २ चमचा, छोटे २ चीज क्यूब ( १५ रु वाले), लालतिखट चवीनुसार मीठ, २ते४ चमचा तेल.



कृती: पालक निवडून स्वच्छ धुवून घ्या. नंतर एकदम थोडे पाणी टाकून फक्त वाफवून घ्या  जास्त शिजवू नका जास्त शिजवल्यास पालकचा  रंग बदलून जाईल आणि पालक थंड होऊ द्या. पालक थंड होईपर्यंत खोबर व कांदा भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तसेच थंड झालेली पालक ची पेस्ट करून घ्या. आणि कढईत तेल घालून पनीरचे तुकडे करून गरम तेलात शॅलोफ्राय करून कढइतून बाहेर काढून घ्या. मग त्याच कढईत थोडे तेल घालून तेल गरम झाल्यावर अद्रक लसूनची पेस्ट टाकून परतून घ्या. नंतर  गॅस कमी करून त्यात लालतिखट, कांदा व खोबऱ्याची पेस्ट घालून परतून घ्या. नंतर पालकांची पेस्ट घालून  थोडे पाणी घाला.छान मिक्स करून घ्या. पाच मिनिटांनी  शॅलोफ्राय केलेली पनीरचे तुकडे टाका . सगळ्यात शेवटी मीठ घालून बारिक गॅसवर  पाच ते दहा मिनिटे शिजून घ्या छान तेल सुटेपर्यंत कलर येईपर्यंत भाजी होऊ द्या.सर्व्ह करताना वरतून चीज किसून टाका.  आणि मिक्स करून घ्या .चव एकदम मस्त येईल. मग   काय तुम्हाला  restaurant सारखीच चव येईल करा तर मग चिजी पालक पनीर
टिप्स: भाजीला हलवताना पनीर तुटणार नाही याची काळजी घ्या. चीज ऐवजी मलई पण घालू शकता. पण मलई ला पनीर टाकल्यानंतर लगेच टाका.

Instant chickan 65 (कोंबडी वडे)






साहित्य: बॉयलर बोनलेस चिकन ५००ग्राम, अद्रक लसूण पेस्ट २ चमचा , मोठे २ते३ चमचा कॉर्न फ्लॉवर,१ अंड, २चमचा मैदा, अर्ध्या लिंबाचा रस, २ चमचा दही, १ चमचा लालतिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला ( लवंग,विलायची,दालचीणी पावडर ) ,चवीनुसार मीठ.



कृती : अगोदर चिकनला लिंबाचा रस व मीठ लावून धुवून घ्या. पूर्ण पाणी काढून टाका. नंतर त्यात अद्रक लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, दही,लालतिखट, हळद,गरम मसाला,  मीठ घालून मिक्स करून ५ ते ७ मिनिटे तसेच राहू द्या नंतर त्यामध्ये  एक अंड ,व कॉर्न फ्लॉवर,मैदा, टाकून परत एकदा छान मिक्स करावे. आपण यात फूड कलर पण टाकू शकतो .पण मला आवडत नाही.तुम्हाला टाकायचा असल्यास टाकू शकता.गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर  चिकनचे एक एक पीस तेलात सोडावे.अगोदर मोठा गॅस  व नंतर  कमी गॅसवर तळून घ्यावेत. कमी गॅसवर तळल्यामुळे चिकन आतपर्यंत शिजते. चिकन लालसर झाले की तेलातून  बाहेर काढा. हॉटेल सारखी चव आपल्याला घरच्या घरी मिळते.
टिप्स: चिकनला लिंबू व मीठ लावून धुतल्यामुळे चिकनला वास येत नाही .

Tuesday, 4 September 2018

Sahaj sopi bhendichi (भेंडीची भाजी)





साहित्य: भेंडी १पाव, १ छोटा कांदा,लसणाची पेस्ट१चमचा, १चमचा लालतिखट, १चमचा धणेपूड, १चमचा जिरेपूड, १/२चमचा हळद,  १चमचा जिरेमोहरी,थोडी कोथिंबीर व चवीनुसार मीठ,२ते३ चमचा तेल.



कृती:  भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या.नंतर भेंडी व कांदा कापून घ्या.गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर  त्यात जिरेमोहरी टाकून ती तडतडल्यावर कांदा टाकुन छान परतून त्यामध्ये लसणाची पेस्ट टाका थोडे परतून गॅस कमी करून लालतिखट, हळद, धनेजिरेपूड टाका
नंतर कापलेली भेंडी टाका मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. झाकण ठेवा. अगदी ५ते७ मिनिटात भाजी तयार भेंडी लवकर शिजते.

Piknik special masur दाल( सहलीसाठी सगळ्यांना आवडणारी मसूर डाळ)







साहित्य: १वाटी मसूर डाळ,१कांदा, ४ते५ लसणाच्या बारीक कापलेल्या पाकळ्या, १ छोटे टमाटर, १चमचा लालतिखट, १/२चमचा हळद, १चमचा काळा मसाला,१चमचा जिरेमोहरी, २ते३ चमचा तेल,थोडीशी कोथिंबीर व चवीनुसार मीठ..


कृती: १ तास डाळ भिजत घालावी.  नंतर डाळीतील पाणी काढून घ्या.कांदा व टमाटर बारीक चिरून घ्या. नंतर गॅसवर कढईत तेल टाकून तेल गरम झाल्यावर जिरेमोहरी टाका नेहमी प्रमाणे जिरेमोहरी तडतडल्यावर त्यात कांदा घालू परतून घ्या. नंतर लसण,टाका .थोडे परतून गॅस कमी करून लालतिखट ,हळद टाकून टमाटर टाका आणि थोडे परतून घ्यावे. व भीजवलेली मसूर डाळ टाका. चवीनुसार मीठ व कोथिंबीर काळा मसाला घालून अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून ५ते७ मिनिटे डाळ शिजून घ्या.लवकर होणारी मोकळी मसूर डाळ तयार मग पिकनिकला जा किंवा ऑफिसच्या आणि शाळेच्या डब्यात पण देऊ शकता.
टिप्स: मसूर डाळ भिजत घातल्याने लवकर शिजते.शिजण्यासाठी पाणी पण कमी लागते.

Sandgyachi bahji (सांडग्याची भाजी)




साहित्य: १वाटी सांडगे,१छोटे टमाटर,अद्रक लसणाची पेस्ट १चमचा,१छोटा कांदा, १ते२चमचा खोबरं भाजून बारीक केलेलं,१ते२चमचा दाण्याचा कूट, १चमचा लालतिखट,१/२चमचा हळद,१चमचा सुहाना मटण मसाला,१ चमचा जिरेमोहरी , कोथिंबीर,चवीनुसार मीठ व तेल.

कृती: सर्व प्रथम एक चमचा तेलात सांडगे भाजून घेणे.एका प्लेटमध्ये भाजलेले सांडगे काढून घेणे. नंतर त्याच कढईत२ते३ चमचा तेल टाका व त्यामध्ये सर्व प्रथम फोडणीसाठी जिरेमोहरी घाला नंतर बारीक चिरलेला कांदा छान परतवून अद्रक लसूण पेस्ट टाका थोडे परतून त्यात बारीक चिरलेला टमाटर घाला गॅस कमी करून लालतिखट, हळद, दाण्याचा कूट,बारीक केलेलं खोबरं टाका. त्या भाजलेले सांडगे टाकून आपल्याला ग्रेव्ही जेवढी पाहिजे तेवढे पाणी घाला आणि तसेच सांडगे शिजण्या साठी अर्धी वाटी जास्त पाणी घाला.वरून सुहाना मसाला  व मीठ टाका व १० मिनिटे शिजू द्यावे. थोडा आपला काळा मसाला व कोथिंबीर घालून. सांडगे नरम म्हणजे शिजल्यावर गॅस बंद करा. चमचमीत अशी सांडग्याची भाजी तयार.

Monday, 3 September 2018

Tamatar chatni (टमाटर ची चटणी)






साहित्य: ४ते५ टमाटर ,१ छोटा कांदा, १चमचा लसणाची पेस्ट, २त३ चमचा दाण्याचा कूट,१चमचा लालतिखट,१/२ हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. फोडणीसाठी १चमचा जिरेमोहरी व तेल.


कृती: टमाटर व  कांदा बारीक चिरून घ्या. गॅसवर पातेल्यात तेल गरम झाल्यावर फोडणीला जिरेमोहरी नंतर कांदा  टाकून लालसर परतून घ्या.मग लसूण पेस्ट पण थोडी परतवून गॅस कमी करून त्यात लालतिखट हळद घालावी त्यानंतर बारीक चिरलेली टमाटर टाकून पाच ते सहा मिनिटे परतून घ्या. टमाटर नरम झाल्यावर त्यात दाण्याचा कूट व मीठ कोथिंबीर घालून परतून घ्यावे. जर का घरात भाजीला काहीच नसेल तर पर्यायी नेहमीच टमाटर ची चटणी असते. मग करा तयार टमाटर चटणी.

Bundi rayta(बुंदी रायता)





साहित्य: १पाव दही, १वाटी प्लेनबुंदी,  भाजलेले जिरे पावडर१ चमचा, लाल तिखट, सेंधव मीठ, चाट मसाला चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर.


कृती: दही फेटून घेणे.दही पातळ हवे असल्यास थोडे पाणी घालावे .नंतर प्लेनबुंदी ,लालतिखट,सेंधव मीठ, चाट मसाला जिरे पावडर टाकून मिक्स करावे. वरतून कोथिंबीर घालून लगेच बुंदी रायता खायला घ्यावा कारण जर उशीर झाला तर बुंदी नरम पडेल.म्हणून जेंव्हा सर्व जेवण तयार झाल्यानंतर बुंदी रायता तयार करावा झटपट बनतो. आपल्याला जर थंड रायता आवडत असेल फ्रिजमध्ये ठेवा. मस्त बुंदी रायता तयार होतो.

Sunday, 2 September 2018

Chatpati Shev puri( चटपटी शेव पुरी)





साहित्य: रेडिमेट पाणी पुरीची पुरी नाहीतर बाजारात कच्च्या पाणी पुरीचे पाकीट मिळते ते आणून तळून घ्या. उकडलेला आलू ,बारीक शेव ,बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लाल टमाटर, चिंचेची चटणी, कोथिंबीर हिरवी मिरची ची चटणी.  लालतिखट चाटमसाला व मीठ.


कृती: सर्व पाणी पुरीला वरच्या बाजूने अंगठयाच्या मदतीने छिद्रे पाडून घ्या. प्रथम पुरीमध्ये उकडून कुस्करलेले आलू मग बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर त्यानंतर शेव त्यावर  चिंचेची चटणी हिरवी चटणी  त्यावर लालतिखट ,चाटमसाला मीठ चवीनुसार टाकणे.वरून कोथिंबीर शेव घाला अश्या प्रकारे सर्व पाणी पुरी तयार करून घ्या. चटपटीत खमंग अशी शेव पुरी घरच्या घरी तयार होईल आणि बच्चा पार्टी खुश होईल.

#shev puri At home #shev puri Recipes # shevpuri #shevpuri chatney # shev puri  #shev puri recipe in marathi #

Coconut puri(ओल्या खोबऱ्याची खमंग पुरी)




साहित्य:  मिक्सर मधून बारीक केलेला ओला नारळ,५ते६ हिरवी मिरची, २ वाटी गव्हाचे पीठ,१/२ वाटी बेसन, ७ते८ लसूण पाकळ्या,  १/२चमचा हळद , १ चमचा जिरेपूड ,बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल


कृती: बारीक केलेला ओल्या नारळाचा किस हिरवी मिरची व लसूण वाटून घ्या.गव्हाचे पीठ,बेसन  जिरेपूड बारीक चिरलेली कोथिंबीर  हळद चवीनुसार मीठ  टाकून पुरीच्या पिठासारखे मळून घ्यावे.५ते ६ मिनिटाने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या. काहीतरी नवीन असा testy ब्रेकफास्ट तयार लोणचे,सॉस, चटणी कशाबरोबर पण छान लागते.अगदी फक्त पुरी खाल्ली तरी मस्तच लागते.

Parmparik shira( शिरा)





साहित्य: 1वाटी रवा(सुजी), पाऊण वाटी साखर, १/२किंवा १ वाटी पण तूप घालू शकता ,  दीड वाटी पाणी, विलायचीपूड , काजू,मनुका,बदाम,पिस्ता .


कृती:  सुरुवातीला रवा स्वच्छ करून घेणे.नंतर पाणी गरम करून घेणे. त्यानंतर कढईत तूप टाकून रवा छान लालसर भाजून घेणे. गॅस कमी करून त्यात गरम पाणी घालावे .पाणी अटल्यावर साखर टाकावी. विलायचीपूड आणि वरतून अर्धा सुकामेवा( काजू, बदाम) घालून कढईवर झाकण ठेवून कमी गॅसवर  पाच मिनिटे ठेवा. शिरा झाल्यावर वरतून उरलेला सुका मेवा घाला. माझ्या परिवाराला थोडा कोरडा शिरा आवडते आपणास जसा शिरा आवडतो त्याप्रमाणे पाणी टाका. आणि पारंपरिक शिरा enjoy करा.


#sheera #sheera recipes #sheera recipe in marathi #sheera recipe in marathi language #sheera recipe without milk #sheera recipe badam # maharashtrian sheera recipe

Corn pakoda (मक्याची भजी)





साहित्य: १ ओल्या मक्याचे दाणे, २  वाटी बेसन, 1/2 चमचा खाण्याचा सोडा,1 चमचा तिळ, १/२ हळद, ४ते५ हिरवी मिरची तुकडे किंवा पेस्ट, बारीक उभा कापलेला १ कांदा , १चमचा लसूण जीरा पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर,ओवा १/२ चमचा, चवीनुसार मीठ व तेल.

कृती: बेसनात मक्याचे दाणे पूर्ण किंवा अर्धे क्रश करून व अर्धे अखंड टाकू शकता. ते आपल्या मनावर आहे.आणि मिरचीपण मुलांना तिखट लागते म्हणून मिरचीचे तुकडे न टाकता पेस्ट टाकावी.बस्स बाकी सर्व वरील साहित्य टाकून भज्याचे पीठ फेटून तयार करा. पाच मिनिटे ठेवून  कढईत तेल गरम करून आपणास आवडेल त्या आकारची छोटी मोठी कुरकुरीत भजी तळून काढा. गरमागरम corn pakoda is Ready to eat.


#pakoda #pakoda recipe in marathi # bhaji recipe in marathi 

Saturday, 1 September 2018

Chinese Fried rice (शिळ्या भातापासून बनवलेला फ्राईड राईस)

साहित्य:  रात्रीचा उरलेला भात, चिंग हक्का नूडल्स मसाला १ पाकीट ,भात जास्त असल्यास मसाला थोडा जास्त घाला. किसलेले किंवा बारीक कापलेले गाजर,  १ सिमलामिरची बारीक किंवा उभी कापलेली, १कांदा उभा कापलेला, २ते३ हिरवी मिरची, ४ ते५ बारीक कापलेल्या लसणाच्या  पाकळ्या ,१/२ इंच बारीक कापलेला अदरकचा तुकडा ,१चमचा जिरेमोहरी, कोथिंबीर व २ते३ चमचा तेल,

कृती: शिळा भात हाताने मोकळा करून घ्या.गॅसवर पातेले ठेऊन तेल गरम झाल्यावर सर्वात अगोदर जिरेमोहरी तडतडल्यावर बारीक कापलेला कांदा बारीक कापलेले अदरक लसनचे काप, छान परतून घ्या त्यानंतर बारीक  कापलेले गाजर ,सिमला मिरची हिरवी मिरची टाकून थोडे परतवून घ्या.त्यानंतर भात व त्यावर चिंगचे १ छोटे पाकीट मसाला घाला.मीठ टाकायचे नाही  कारण मसल्यामध्ये भरपूर मीठ असते. भात छान परतवून घेऊन त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. लहान मोठ्यांना आवडणारा फ्राईड राईस तयार "




#fried rice # ching Fried rice recipes #ching fried rice #fried rice recipe in marathi 

Andhra padhticha ambat bhat{ ambat bhat}




 साहित्य: २ प्लेट शिजवलेला भात, १चमचा उडीद डाळ, १ चमचा चणाडाळ , १ चमचा लालतिखट , १/२ चमचा हळद,४ते५  वाळलेली लाल मिरची, १चमचा जिरेमोहरी, १/२ वाटी चिंचेचा कोळ,कडीपत्ता, कोथिंबीर, आवडीनुसार मीठ व शेंगदाने, २ते३चमचा ,तेल.

कृती: सर्व प्रथम गॅसवर कढईत तेल टाकावे .तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरेमोहरी नंतर उडीद व चनाडाळ, शेंगदाणे भाजून घ्यावी.मग कडीपत्ता ,लाल मिरची (सुकी) घालून गॅस कमी करून त्यात लालतिखट व हळद, चिंचेचा कोळ घालून २ते३चमचा पाणी घालून ४ते५ मिनिट परतून घेऊन नंतर त्यामध्ये भात व चविनुसार मीठ कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि  झाकण ठेवून एक वाफ काढावी .घरच्या घरी आंध्रप्रदेशचा भात तयार त्यासाठी आंध्रात जायची गरज नाही बर का!

टिप्स: यासाठी रात्रीचा शिळा भात असेल तर उत्तमच तुमचा आंबट भात पटकन तयार होईल.