साहित्य : २ अंडी ,१/२ टीस्पून लालतिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, तेल.
कृती : तवा गॅसवर ठेऊन गॅस पेटवून घ्या.तवा गरम होईपर्यन्त एका वाटीत एक चमचा पाणी घ्या त्यात लालतिखट हळद व चविनुसार मीठ घालून मिक्स करा नंतर अंडी फोडून टाका व फेटून घ्या .तव्यावर तेल टाकुन फेटलेले अंड्याचे मिश्रण तेलावर पसरून टाका.खालची बाजू भाजली की ऑम्लेट पलटून घ्या.बस्स पाच मिनिटात ऑम्लेट तयार होईल.हे ऑम्लेट लहान मुलांना खुप आवडेल कारण ह्यात कांदा मिरची असे मुलांना न आवडणारे काहीच नाही.टेस्टी व चवपन चांगली लागते.
टिप्स : अंडी फेटण्या अगोदर पाणी टाकल्यास चटणी मीठ ऑम्लेटला यवस्थित लागते गुठळ्या होत नाहीत.
0 comments:
Post a Comment