साहित्य : ५००ग्राम मटण, १ कांदा बारीक चिरलेला, अद्रक लसणाची पेस्ट २ चमचा, १ चमचा लालतिखट,१/२ चमचा हळद, १ चमचा काळा मसाला, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा जिरेपूड, १ चमचा गरम मसाला, १ ते २ चमचा भाजून कुटलेला खोबरा, असेल तर तंदुरी मसाला १ चमचा, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल.
कृती : सर्वात अगोदर मटण लिंबू व मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. नंतर गॅसवर कढईत तेल घालून अद्रक लसणाची पेस्ट घालून फोडणी करून त्यात मटण टाका नंतर हळद व मीठ घाला आणि पाणी घालून मटण नरम शिजवुन घ्या.त्यानंतर शिजलेल्या मटणामधील पाणी काढून घ्या. हे पाणी ग्रेव्हीसाठी उपयोगात आणले जाते. या नंतर दुसऱ्या कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे नंतर कांदा घालून परतावे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाका. गॅस कमी करून लालतिखट, हळद,काळा मसाला,, बारीक केलेला खोबरा, गरम मसाला धणेपूड, जिरेपूड,तंदुरी मसाला घाला मिक्स करा नंतर मटण घाला चवीनुसार मीठ व कोथिंबीर घाला.छान परतवून घ्या. बस्स झालं तयार मटण सुक्का मस्त टेस्टी लागते एकदा तरी करून पाहा.
0 comments:
Post a Comment