साहित्य: २ वाट्या हिरवेमुग, १ वाटी तांदूळ, १ कांदा, ३ते ४ हिरवी मिरची, ५ते ६लसूण पाकळ्या, ४ ते ५ कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर.
कृती: हिरवेमुग व तांदूळ पाच ते सहा तास पाण्यात भिजत घालावे. पाच ते सहा तासानंतर त्यातील पाणी पूर्ण काढून टाकावे. आणि मिक्सर मध्ये मूग व तांदळाची मऊसर पेस्ट करून घ्यावी. मग कांदा, मिरची,लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घ्या. किंवा तुम्ही मूग व तांदळा सोबतच मिक्सरमध्ये बारीक करू शकता. नंतर त्यात चवीनुसार मीठ व थोडे पाणी घालून डोश्याप्रमाणे मिश्रण तयार करावे. गॅस चालू करून नॉनस्टिकी तव्यावर डोस्याप्रमाणे दोषे करून घ्या . एरवी लहान मुलांसोबत मोठेही कढीपत्ता कांदा कोथिंबीर हे खात नाहीत पण असे केल्यामुळे सर्व खाल्ल्या जाते आणि हिरवेमुग तर शरीराला पौष्टीक आहेतच मग आहेत न पौष्टीक डोसे चला मग पहा तर करून हे डोसे सॉस चटणी, नाहीतर आपली इडलीची शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता.
0 comments:
Post a Comment