साहित्य: २ वाट्या वाटाणे, १ चमचा जिरे मोहरी, २ टेबल स्पून तेल,१/२ चमचा हळद,
कृती: वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले. गॅस चालू करून कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून चांगली तडतडल्यावर भिजवलेले वाटाणे घाला नंतर हळद चवीनुसार मीठ घालावे. अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या काढाव्यात. कुकरची वाफ गेल्यावर कुकर उघडा जर थोडे पाणी असेल तर कुकरचे झाकण न लावता पाणी आटवून घ्या .जर पाणी नसेल तर उत्तमच बस्स टिफिन रेडी अगदी मुलांना तयार करतच तुम्ही बनवू शकता फक्त फोडणी घातली की झाले काम.
0 comments:
Post a Comment