साहित्य: मोड आलेली मटकी, १ कांदा, १ टमाटर, लसणाची पेस्ट, १ चमचा लालतिखट,१/२ चमचा हळद, जिरेमोहरी ,कढीपत्ता, कोथिंबीर चवीनुसार मीठ.
कृती: गॅस चालू करून त्यावर कढईत तेल गरम झाल्या वर तेलात जिरेमोहरी टाकून ती तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या नंतर लसणाची पेस्ट टाका ती पण परतून घ्या. कढीपत्ता घाला मग बारीक चिरलेला टमाटर टाका नंतर लालतिखट, हळद,घालावी छान टमाटर नरम होई पर्यंत परतून घ्यावे. सगळ्यात शेवटी मटकी घालावी छान मिक्स करून वरतून थोडे पाणी घालावे .चवीनुसार मीठ घालून परतावे. पाणी आटे पर्यंत मटकी शिजवुन गॅस बंद करून वरतून कोथिंबीर घालावी. मटकी तयार झाली मुलांना शाळेत डब्यात दया नाहीतर घरी खा.
0 comments:
Post a Comment