साहित्य: २ ते ३ बनवून तयार असलेली गव्हाची पोळी(चपाती), बनवलेली बटाट्याची सुकी भाजी, बारिक चिरलेला १ ते२ कांदा ,१ते2 बारीक चिरलेला टमाटर, बारीक शेव, २ ते३ चमचा बेसन , टमाटर चा सॉस,चीज,लालतिखट, चवीनुसार मीठ.बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती: सर्व प्रथम बेसनात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करून घ्या.नंतर पोळीच्या वरच्या बाजूला बटाट्याची भाजी व्यवस्थित लावून त्यावर चमच्याने बेसनाचे एक ते दोन चमचा मिश्रण टाकून पसरून घ्या. नॉनस्टिक तव्यावर बेसनाचे मिश्रण लावलेली पोळी जशास तशी तव्यावर ठेवावी. नंतर गॅस चालू करा . तवा गॅसवर ठेवा आणि तवा गरम झाल्यावर पसरट चमच्याने पोळी पलटून घ्या की जनेकरून लावलेले बेसन भाजल्या जाईल दोन तीन मिनिटांनी पोळी दुसऱ्या बाजूने पलटून घ्या. नंतर बटाट्याची भाजी लावलेली बाजू वर येईल त्यावर १चमचा सॉस लावून पसरून। घ्या आणि सॉसवर कांदा, टमाटर पूर्ण पोळीवर पसरून टाका नंतर त्यावर किसलेले चीज टाका पोळी थोडावेळ कमी गॅसवर चीज सेट होई पर्यँत ठेवा. पोळी साधारण कडक झाली की तव्यावरून खाली उतरून घ्या. नंतर त्यावर बारीक शेव भुरभुरावी थोडे चीज अजून घालावे.लालतिखट व मीठ घालावे .शेवटी कोथिंबीर घालावी मोगलाई पराठा तयार झाला.पिझ्झा कटरने कापून सर्व्ह करावे. यम्मी मोगलाई पराठा तयार.
टिप्स: ताज्या पोळी ऐवजी शिळी पोळी तसेच शिळी बटाट्याची भाजी चालेल,तुमचा शिळ्या पोळ्यांचा प्रश्न मीट
लाच समजा मग बनवा यम्मी मोगलाई पराठे.
# paratha # Easy paratha recipes #paratha recipe in marathi # paratha recipes in marathi #paratha banane ka tarika
लाच समजा मग बनवा यम्मी मोगलाई पराठे.
# paratha # Easy paratha recipes #paratha recipe in marathi # paratha recipes in marathi #paratha banane ka tarika
0 comments:
Post a Comment