साहित्य: १/२ किलो पालक, १पाव (२५० ग्राम) पनीर, २५ ते ५० ग्राम खोबर, १ मीडियम आकाराचा कांदा, अद्रक लसूण पेस्ट २ चमचा, छोटे २ चीज क्यूब ( १५ रु वाले), लालतिखट चवीनुसार मीठ, २ते४ चमचा तेल.
कृती: पालक निवडून स्वच्छ धुवून घ्या. नंतर एकदम थोडे पाणी टाकून फक्त वाफवून घ्या जास्त शिजवू नका जास्त शिजवल्यास पालकचा रंग बदलून जाईल आणि पालक थंड होऊ द्या. पालक थंड होईपर्यंत खोबर व कांदा भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तसेच थंड झालेली पालक ची पेस्ट करून घ्या. आणि कढईत तेल घालून पनीरचे तुकडे करून गरम तेलात शॅलोफ्राय करून कढइतून बाहेर काढून घ्या. मग त्याच कढईत थोडे तेल घालून तेल गरम झाल्यावर अद्रक लसूनची पेस्ट टाकून परतून घ्या. नंतर गॅस कमी करून त्यात लालतिखट, कांदा व खोबऱ्याची पेस्ट घालून परतून घ्या. नंतर पालकांची पेस्ट घालून थोडे पाणी घाला.छान मिक्स करून घ्या. पाच मिनिटांनी शॅलोफ्राय केलेली पनीरचे तुकडे टाका . सगळ्यात शेवटी मीठ घालून बारिक गॅसवर पाच ते दहा मिनिटे शिजून घ्या छान तेल सुटेपर्यंत कलर येईपर्यंत भाजी होऊ द्या.सर्व्ह करताना वरतून चीज किसून टाका. आणि मिक्स करून घ्या .चव एकदम मस्त येईल. मग काय तुम्हाला restaurant सारखीच चव येईल करा तर मग चिजी पालक पनीर
टिप्स: भाजीला हलवताना पनीर तुटणार नाही याची काळजी घ्या. चीज ऐवजी मलई पण घालू शकता. पण मलई ला पनीर टाकल्यानंतर लगेच टाका.
0 comments:
Post a Comment