साहित्य : १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी दाळवे ,४ ते५ हिरवी मिरची, २ते४बदाम ,१ चमचा जिरेमोहरी, कढीपत्ता, चवीनुसार मीठ.
कृती : शेंगदाणे थोड्या तेलात छान भाजून घेणे .थंड झाल्यावर मिक्सरमध्ये शेंगदाणे व दाळवे आणि बदाम थोडे बारीक करून नंतर त्यामध्ये पाणी घालून एकदम मस्त बारीक पेस्ट तयार करून घ्या. पातेल्यात शेंगदाण्याची पेस्ट काढा . तूम्हाला चटणी जशी हवी तसे पाणी घाला म्हणजे घट्ट पाहिजे असल्यास कमी पाणी पातळ हवी असल्यास जास्त पाणी घाला नंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. आता तडका तयार करूया गॅसवर एका पातेल्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून तडतडल्यावर गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्ता टाका. हिरवी मिरची भाजून झाल्यावर शेंगदाण्याच्या मिश्रणात तडका टाकून छान मिक्स करा.
0 comments:
Post a Comment