साहित्य: ४ते५ टमाटर ,१ छोटा कांदा, १चमचा लसणाची पेस्ट, २त३ चमचा दाण्याचा कूट,१चमचा लालतिखट,१/२ हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. फोडणीसाठी १चमचा जिरेमोहरी व तेल.
कृती: टमाटर व कांदा बारीक चिरून घ्या. गॅसवर पातेल्यात तेल गरम झाल्यावर फोडणीला जिरेमोहरी नंतर कांदा टाकून लालसर परतून घ्या.मग लसूण पेस्ट पण थोडी परतवून गॅस कमी करून त्यात लालतिखट हळद घालावी त्यानंतर बारीक चिरलेली टमाटर टाकून पाच ते सहा मिनिटे परतून घ्या. टमाटर नरम झाल्यावर त्यात दाण्याचा कूट व मीठ कोथिंबीर घालून परतून घ्यावे. जर का घरात भाजीला काहीच नसेल तर पर्यायी नेहमीच टमाटर ची चटणी असते. मग करा तयार टमाटर चटणी.
0 comments:
Post a Comment