साहित्य
: २ वाट्या बेसन, १ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी ज्वारीचे पीठ, १ किसलेली
काकडी, २ चमचा लसणाची पेस्ट, १चमच लालतिखट, १/२चम्मच हळद, १ चमचा
जिरेपूड, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ व तेल.
कृती
: बेसनात गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ ,किसलेली काकडी, लसणाची पेस्ट,
लालतिखट, हळद,जिरेपूड मीठ, कोथिंबीर २ चमचा तेल टाकून मिक्स करा. नंतर थोडे
थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. चपाती प्रमाणे धपाटे लाटून घ्या. गॅस चालू
करून तवा ठेवा व धपाटे तेल लावून छान भाजून घ्या. धपाटे दही,सॉस,चटणी,
कशाही सोबत छान लागतात.
0 comments:
Post a Comment