साहित्य: ३ उकडलेले आलू, २ ब्रेड , कॉर्न फ्लॉवर ३ मोठे चमचा, २५ ग्राम चीज ( १ तुकडा) , चवीनुसार मीठ ,तळण्यासाठी तेल.
कृती: ब्रेडची काठ ( कडा)काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.एका टोपल्यात ब्रेडचा चुरा व चिज किसून टाका चीज जास्त टाकू नका जास्त टाकल्यास तेलात वितळू शकते नंतर किसलेले आलू टाका . कॉर्न फ्लॉवर चवीनुसार मिठ टाका मिक्स करून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर काळीमिरी पावडर टाकू शकता. पण मुलांसाठी असेच छान लागते. नंतर एक प्लेट घेऊन त्यात एक चमचा तेल टाकून तयार केलेले आलूचे मिश्रण एकजीव करावे. मळलेले आलूचे मिश्रण हवा बंद डब्यात ठेऊन पंधरा ते वीस मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. पंधरा ते वीस मिनिटानंतर ताटावर एका पॉलिथिनवर तयार केलेल्या मिश्रणामधून अर्ध्या गोळा ठेऊन त्यावर अजून एक पॉलिथिन ठेवा आणि लाटण्याच्या मदतीने जाडसर मोठी पोळी लाटून घ्या. वरची पॉलिथिन काढून टाका व पाणी पुरी सारख्या पुऱ्या कटरच्या मदतीने पाडून घ्या.नंतर त्या पुरीला स्मायली चेहरा तयार करा. तयार झालेल्या स्मायली पुऱ्या एका प्लेटवर काढून वीस मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात एक एक करून स्मायली पुरी टाका आणि मीडियम गॅसवर तळून घ्या. पुऱ्या तळतेवेळलेस एकमेकांना चिटकणार नाही म्हणून काटा चमचे अधून मधून हलवत राहा. साधारण तपकिरी रंग येई पर्यंत तळून घ्या.
टिप्स: स्मायलीज पुरी हवा बंद डब्यात ठेऊन. जेंव्हा तुम्हाला पाहिजे तेंव्हा तळून घ्या. तुमचा वेळ वाचेल आणि स्मायलीज झटपट बनतील.
0 comments:
Post a Comment