Wednesday, 12 September 2018

Pakodevali kadhi ( पकोडेवाली कढी )




कढीचे साहित्य: २५०ग्राम दही, २ते ३चमचा बेसन, ( ४ ते ५ हिरवी मिरची, ५ते६ लसूण पाकळ्या, १/२चमचा जिरे, थोडी कोथिंबीर ) या सर्वांची पेस्ट तयार करा मग ती खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये तयार केली तरी चालेल. १ चमचा जिरे मोहरी , १/२ हळद कढीपत्ता चवीनुसार मीठ आणि तेल,.
पकोडयाचे साहित्य: १ ते २ वाट्या बेसन, १ चमचा लसन जिरे एकत्र कुटलेले, एक चुटकी खाण्याचा सोडा, आवडीनुसार लालतिखट चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल.

कृती: कढी बनवण्यासाठी दही व बेसन एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या.आणि मग त्या मध्ये साधारण एक ग्लास पाणी टाकून पातळ मिश्रण  करून घ्या. नंतर गॅसवर पातेलं ठेवून गॅस चालू करा. पातेल्यात तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरची लसणजीरे यांची पेस्ट  टाकून चांगले परतून घ्यावे .कढीपत्ता व हळद  घालून तयार केलेले बेसनदह्याचे मिश्रण घाला . चवीनुसार मिठ घालून एक दोन  उकळी येई पर्यंत चमच्याने हलवत राहा.जनेकरून कढी उतू जाणार नाही याची काळजी घ्या.कढी तयार झाली. गॅस बंद करा .आता पोकोडे बनवुयात एका टोपल्यात बेसन ,सोडा,लालतिखट, लसनजिरेपेस्ट,चवीनुसार मीठ  व पाणी  घालून भज्जीच्या  मिश्रनासारखे  पीठ तयार करून घ्या . कढईत तेल तापल्यावर  नेहमी प्रमाणे भज्जी तळून घ्यावे. आणि कढीत टाकून वरतून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.पकोडे टाकल्यामूळे कढी ची चव काही औरच लागते जरूर ट्राय करा पकोडेवाली कढी.
टिप्स: जर का आपणास कढी घट्ट पाहिजे असल्यास बेसन थोडे जास्त घाला.तसेच कढि खूप आंबट झाल्यास कढी उकलतेवेळेस थोडे पाणी किंवा आवडत असल्यास साखर घालू शकता.

0 comments:

Post a Comment