Thursday, 30 August 2018

Shevalyacha upma(शेवाळ्याचा उपमा)





साहित्य: १ते २ वाटी शेवाळ्या, १ मीडियम साईजचा कांदा, ५ते६ हिरवी मिरची,४ते५ लसनाच्या  पाकळ्या ,१/२चमचा हळद, १चमचा जिरेमोहरी, १५ ते२० (१/२)शेंगदाणे, कडीपत्ता,  कोथिंबीर चवीनुसार मीठ व तेल.


कृती :  सर्व प्रथम १ चमचा तेलात शेवळ्या  साधारण भाजून घ्या.बाजूला काढून घ्या .नंतर त्याच कढईत तेल टाकून तेल तापल्यावर जिरेमोहरी टाका नंतर बारीक चिरलेला कांदा ,हिरवी मिरची,लसूण शेंगदाणे घालून भाजून घ्या. कडीपत्ता  व आवडत असल्यास १छोटे  बारीक कापलेले टमाटर घाला थोडे परतून दीड वाटी पाणी घाला त्यात  हळद व मीठ घाला व पाणी उकळल्यावर त्यामध्ये भाजलेल्या शेवळ्या घाला पाच मिनिटे शिजू द्या. कोथिंबीर घाला तुम्हाला आवडत असल्यास सुके खोबरे घालून खायला द्यावे.

Wednesday, 29 August 2018

Rava Upma( उपमा)







साहित्य: १ वाटी रवा, १ कांदा, ४ते५ हिरवी मिरची,आवडत असल्यास थोडे शेंगदाणे,१चमचा उडीद डाळ ,१चमचा जिरेमोहरी, मोठे २ते३ चमचा तेल, कडीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती: प्रथम रवा स्वच्छ चाळून घ्या.नंतर एका पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवा.दुसऱ्या गॅसवर कढईत तेल गरम करून अगोदर जिरेमोहरी नंतर उडीद डाळ थोडी भाजून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची शेंगदाणे कडीपत्ता टाकून भाजून घ्या.नंतर रवा टाकून भाजून घ्या चवीनुसार मीठ टाकून त्यात जेवढे पाहिजे तेवढे म्हणजे उपमा चिकट  हवा असल्यास जास्त नाहीतर तूम्हाला लागेल असे गरम पाणी ओतून छान कालवून घ्या की जनेकरून उपम्यात गाठी होणार नाहीत. वरतून कोथिंबीर घाला.  कमी गॅसवर कढईवर  झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवा  व नंतर गॅस बंद करा गरमागरम उपमा दही किंवा चटणी कशाबरोबर पण  खाण्यास तयार आहे.

टिप्स: तेल जास्त  आवडत असल्यास टाकू शकता अजूनच उपमा टेस्टी लागेल.

#upma recipe # upma recipe in marathi #

Maharashtriyan pohe( सगळ्यांचे आवडते पोहे)





साहित्य: 250ग्राम पोहे,१ते२ कांदे, ७ते८ हिरवी मिरची,  आवडीनुसार शेंगदाणे, कडीपत्ता, कोथिंबीर,१चमचा जिरेमोहरी,2ते3 चमचा तेल १/२चमचा हळद ,किसलेले खोबरं चवीनुसार मीठ..


कृती: सर्वात अगोदर मीडियम पोहे स्वच्छ धुवून ठेवा. पोहे छान भिजे पर्यंत कांदा मिरची बारीक कापून घ्या. नंतर कढईमध्ये तेल गरम झाले असता त्यामध्ये जिरेमोहरी टाका. जिरेमोहरी तडतडल्यास  कांदे घालावे.कांदे छान परतून घेऊन शेंगदाणे हिरवी मिरची घालून परतून कडीपत्ता घाला,सर्व चांगल्या प्रकारे भाजून घ्या गॅस कमी करून हळद व पोहे  चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ४ते५ मिनिटे ठेवा, प्लेटमध्ये पोहे त्यावर कोथिंबीर व किसलेल खोबरं घाला. अगदी सहज  तयार होणारे पोहे'''

Instant Suhana chikan masala( झटपट सुहाना चिकन मसाला)



साहित्य: अगदी थोड्या सामग्री मध्ये होणारी आणि कोणालाही बनवता येणारी अशी चविष्ट भाजी .५00 ग्राम चिकन, सुहाना चिकन मसाला, अद्रक लसूण पेस्ट ,१चमचा लालतिखट, कोथिंबीर,  २ते३ चमचा तेल  लागेल 
 तरच मीठ घालावे कारण मसल्यामध्ये मीठ असते.बस्स आहे न थोडी सामग्री!

कृती: चिकनला लिंबू व मीठ लावून धुणे त्यामुळे चिकनचा वास येणार नाही.अगोदर सुहाना  मसाला एक वाटी  पाण्यात गुठळ्या न होता   कालवून घेणे नंतर गरम तेलात अद्रक लसणाची पेस्ट टाकून परतून घ्या.गॅस कमी करून लालतिखट व सुहाणाचे मिश्रण घालून परतून घेणे. ग्रेव्हीसाठी थोडे पाणी घाणे. १०ते 15 मिनिटे झाकण ठेवून चिकनला शिजू देने अवघ्या १५ मिनिटात चिकन तयार वरतून कोथिंबीर टाकून झटपट चिकन तयार होईल. चवीला लागत असल्यास मीठ घालावे.

टिप्स: चिकन बॉयलारच हवे कारण ते पटकन शिजते.

QUick पोटॅटो (बटाटे न उकडता बनवलेली सुक्की भाजी)



 साहित्य: ५ ते ६ बटाटे, लसूण कोथिंबीर ची पेस्ट, १चमचा लालतिखट,१/२चमचा हळद, १चमचा धणेपूड,१चमचा जिरेपूड,  १ छोटे टमाटर, १चमचा काळा मसाला घरी बनवलेला नाहीतर तुमच्या कडे जो असेल तो चवीनुसार मीठ १चमचा जिरेमोहरी २चमचा तेल बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती: बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. नंतर बारीक तुकडे करून घ्या. गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात जिरेमोहरी नंतर लसणाची पेस्ट टाका लसण परतून झाला की बारीक चिरलेली टमाटर टाकून थोडे परतून घेणे नंतर कापलेले बटाटे टाका आता लालतिखट धनेजिरेपूड काळा मसाला घालून  व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. नंतर कमी गॅसवर झाकण ठेवून शिजू दया. अधूनमधून परतुन घ्या,बस्स ६ ते ७ मिनिट मध्ये बटाट्याची सुक्की भाजी  तयार मग पुरी सोबत खा की पोळी सोबत टेस्टीच लागणार काय तर मग कराल न!





#aaloo chi bhaji recipe, #aaloo chi bhaji kaise banate hai # aaloo mutter #aalo mutter dhaba style #aaloo ki bhaji banane ka tarika #aalooo ki bhajiya #aalo bhaji puri #aalo recipes

Tuesday, 28 August 2018

Chatpatit karlyachya kachrya( चटपटीत कारल्याच्या काचऱ्या)








साहित्य :  १ पाव कवळी कारली, हळद १/२चमचा, १चमचा जिरेमोहरी,२ते३चमचा तेल चवीनुसार मीठ.

  कृती: कारल्याचे 2ते३ इंच आकाराचे  बारीक उभे काप कापून घेणे. गरम तेलात जिरेमोहरी तडतडल्यावर
   कापलेली कारली टाका नंतर हळद व मीठ टाका . मस्त लालसर खरपुस कारली भाजून घेणे थोडा वेळ लागेल पण कडू कारली गोड लागतील. आवडत असल्यास शेंगदाणे तेलात भाजून टाका.

Mithache vange(मिठाचे वांगे)





साहित्य: ७ते८ छोट्या आकाराची वांगी, १ चमचा जिरे मोहरी, २ते३ चमचा तेल,चवीनुसार मीठ.



कृती: भरल्या वांग्या सारखी वांगी कापून घेणे. व त्यामध्ये एक  वांग्यात एक चुटकी याप्रकारे सर्व वांग्यात मीठ भरणे.गॅसवर तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी टाका जिरे मोहरी तडतडल्यावर त्यात मीठ भरलेली वांगी टाकुन हलून घेऊन झाकण ठेवा. कमी गॅसवर ठेवा अधुमधून चमच्याने हलून परत झाकण ठेवा.असे ५ते७ मिनिटे करा.अगदी ५ते७ मिनिटात वांगे नरम होतील चविष्ट झटपट व मूलांना आवडणारी साधी सोपी रेसिपी आहे.

Monday, 27 August 2018

Kurkurit mugache pkode (मुगाचे पकोडे)





साहित्य:  मुगाची डाळ २५० ग्राम, १ते2 कांदे,८ते१० लसूण पाकळ्या, १चमचा जिरेपूड, ७ते८ हिरवी मिरची, १चमचा तीळ ,चिमूटभर खाण्याचा सोडा, १/२ चमचा हळद ,थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ.


कृती: मुगाची डाळ २ते३ तास भिजत घाला. नंतर स्वच्छ धुवून पाणी काढून घ्या. मिक्सर मधून हिरवी मिरची , लसूण मुगाची डाळ बारीक करून घ्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा ,कोथिंबीर, हळद, जिरेपूड,तीळ, खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. गरम तेलात जमत असेलतर हाताने नाहीतर चमच्याने सोडावे.मस्त असे लालसर कुरकुरीत तळून घ्या. पचायला हलके मस्त कुरकुरीत मुगाचे पकोडे गरमागरम खाण्यासाठी तयार.

#moog pakode #moong pakoda kaise banaye #moong pakoda Recipe #moog pakoda kaise banate hai #moog pakoda recipes in marathi #moog pakode bhajiya #

Lajjtdar bhendi kurkure (लज्जतदार भेंडी कुरकुरे)





साहित्य: २५०ग्राम भेंडी, ५ ते ६चमचा बेसन, १ चमचा  लसून कोथिंबिरीची पेस्ट, १चमचा लालतिखट,१ चमचा जिरेपूड,१/२ चमचा धणेपूड,१/२ चमचा हळद, चवीनुसार मीठ व चाट मसाला तळण्यासाठी तेल.

कृती:   भेंडीला स्वच्छ धुवून व पुसून घेणे . त्यानंतर भेंडी बारीक उभी कापून घेणे, ताटत कापलेली भेंडी घेऊन त्यात बेसन,लसूनकोथिंबीरची पेस्ट, लालतिखट, जिरेपूड, धणेपूड, हळद,मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे, सर्व मसाला कापलेल्या भेंडीला मस्त लावून घ्या. कढईत तेल गरम करून भेंडीला सुटसुटीत तळून घ्या चिकटू देऊ नका.छान कुरकुरीत अशी भेंडी तळून झाल्यावर त्यावर चाट मसाला  टाकून   मिक्स करा,चटपटी भेंडी कुरकुरे तयार होतील लहान व मोठ्यांना आवडणारी भेंडी कुरकुरे.


#bhindikurkuri #Bhindi kurkuri in hindi # Bhindi Kurkuri in Marathi #Bhindi kurkuri recipes #bhindi kurkuri kaise banaye #Bhindi kurkure #kurkuri bhindi kaise banaye #kurkuri bhindi masala

Basmati tandalachi khir (बासमती तांदळाची खीर)





 साहित्य: १ लिटर दुध, १/२ वाटी बासमती तांदूळ, २वाटी साखर, १ते२ चमचा तूप, आवडीनुसार काजू,बदाम, पिस्ता,.विलायचीपूड.

कृती:  १५ मिनिटे तांदूळ भिजवून नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका.गॅसवर दूध गरम करून थोडा वेळ मंद आचेवर दूध उकळेपर्यंत  दुसऱ्या गॅसवर   भिजवून  कोरडे केलेले तांदूळ तूप टाकून छान भाजून घ्या. तांदूळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून उकळलेल्या दुधात घाला .गाठी होऊ नये याची काळजी घ्या.५ते६ मिनिटे झाल्यावर साखर ,विलायचिचीपूड घाला.५ते६ मिनिटे मंद आचेवर खीर शिजू द्या व काजू,बदाम,पिस्ता यांचे बारीक काप करून वरतून घालून सगळ्यानां  खाण्यासाठी स्वादिष्ट खीर तयार.

#basmati rice khir #basmati tandlachi khir #khir recipe in marathi #

Saturday, 25 August 2018

Paneer biryani { पनीर बिर्याणी}







साहित्य: २५०ग्राम पनीर,२५० ग्राम बासमती तांदूळ ,२ते३ टमाटरची पेस्ट,  २ते४ लालसर तळलेले कांदे, २ते४  चमच अद्रक लसणाची पेस्ट, १०ते १२ हिरवी मिरची,२ते३ तेजपान,२विलायची, ४ते५ लवंग,२ते३ दालचिनी (कलमी), २ते३ चमच एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, १चमचा गरम मसाला, १ते२ चमचा धनेजिरेपूड,३ चमचा तूप, जवळपास ४ चमचा तेल,१ चमचा जिरे, १ चमचा लालतिखट ,१/२ चमचा हळद , बारीक चिरलेला कांदा ,चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर .



 कृती:  तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि गॅसवर पाणी ठेऊन त्यात लवंग विलायची तेजपान दालचिनी व चमचाभर तूप व मीठ घालून ५ते७ मिनिटे तांदूळ अर्धवट शिजवून घेऊन त्यातील जास्तीचे  सर्व पाणी भातातून चाळणीच्या मदतीने काढून घ्यावे.आणि एका ताटात भात टाकून पंख्याखाली थंड करावे. भात थंड होईपर्यंत गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे    घालून नंतर चिरलेला कांदा घालुन लालसर परतवून त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून छान परतावे.नंतर गॅस कमी करून त्यात लालतिखट, धनेजिरेपूड, हळद टमाटरची पेस्ट टाकावी पाच मिनिटं छान परतवून गरम मसाला व बिर्यानी मसाला घालावा थोडे परतून अगदी थोडे पाणी घालून मिक्स करा दोन मिनिटं परतवून अर्धी वाटी पाणी घालावे.आणि मीठ घालुन पनीरचे तुकडे टाकून पाच मिनिटं शिजवुन घ्या व गॅस बंद करा.
आता दम बर्यानी लावण्यासाठी एक पातेलं घ्या .प्रथम पातेल्यात बनवलेले अर्धे पनीरचे मिश्रण व्यवस्थीत पसरून घेणे नंतर त्यावर थंड झालेला भात पसरवून घ्या भातावर तळलेले कांदे ,मिरची,कोथिंबीर व्यवस्थित   पसरवून घ्या .त्यानंतर अर्धे राहिलेले पनीरचे मिश्रण त्यावर भाताचे मिश्रण त्यावर कांदा, मिरची ,कोथिंबीर पसरवावी अगदी शेवटी दोन तीन चमच तूप घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. झाकन पोळीचे पीठ लावून (कणिक)बंद करावे किंवा झाकणावर जड वस्तू ठेऊन बंद करून     घेणे गॅस एकदम कमी करून बिर्याणीचे पातेले १० ते१५ मिनिटे ठेवून गॅस बंद करा.



 #Biryani #paneer Biryani # Veg Biryani #Dum Biryani #Hydrabadi Biryani #rice #Veg Pulaav #birayani recipe #Biryanikaisebanatehai #Biryani Video #paneerBiryaniInmarathi #Paneerbiryani Archana #paneer Biryani Recipe

Matar paneer (मटर पनीर)

साहित्य:  200ग्राम पनीर ,१००ग्राम मटर,२मीडियम साईजचे कांदे ,२टमाटर,१इंच अद्रकचा तुकडा, ९ते१० लसूण पाकळ्या, २चमचा लाल तिखट,१चमचा जिरेपूड,१चमचा धणेपूड,१/२ चमचा हळद,४ते५चमचा सुहाना पनीर बटर मसाला, १चमचा जिरे , थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ,२ते३ चम्मच तेल.

.
कृती: प्रथम कांदा टमाटर अद्रक लसूण  यांना गॅसवर कढईत तेल गरम करून  थोडे भाजून घ्यावे व थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी . नंतर कढईत २ते३ चमचा तेल घेऊन जास्त आवडत असल्यास थोडे जास्त तेल घेणे. गरम तेलात जिरे घालून  गॅस कमी करून लाल तिखट,धनेजिरे पावडर  हळद घातल्यावर कांदा टमाटर ची  पेस्ट घालून ५ मिनिटे छान परतून घेणे.त्यानंतर  सुहाना  पनींर बटर मसाला घालावा नंतर अगदी थोडे पाणी घालून ५ते6  मिनिटे परतून घ्यावे. मटर व पनीरचे काप करून घालावेत व आपणास आवडेल असी ग्रेव्हीत पाणी घालून मीठ घालावे व आवडत असल्यास मलई २ चमचा घातल्यास  भाजीची चव मस्त लागते.बस्स ७ते८ मिनिटे कमी गॅसवर भाजीला ठेऊन द्यावे. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी. हॉटेल मधल्यासारखी टेस्टी मटर पनीर तयार आहे. तुम्ही ही भाजी खाल्यास हॉटेलची जिभेवर चव नक्कीच  येणार  बस्स मग काय बनवणार न  ही भाजी  एकवेळ जरूर ट्राय करा.

टिप्स: ग्रेव्हीचे प्रमाण जास्त पाहिजे असल्यास ७ते८ काजू  कांदा व टमाटरच्या पेस्टमध्ये घालावे.

#mutter panner recipe in marathi #mutter paneer #mutter paneer masala Recipe #mutter paneer dhba style #mutter paneer paratha #mutter paneer pulao #mutter paneer recipe in marathi video #

Friday, 24 August 2018

Gulab jamun- गुलाब जामुन
















साहित्य: १किलो खवा, ५००ग्राम साखर, १०० ग्राम रवा,१००ग्राम मैदा , पाकात टाकण्यास विलाईची पूड , तळण्यासाठी तेल

कृती:  मोठ्या ताटात खवा घेऊन त्यात चाळलेला मैदा रवा घालून चांगल्याप्रकारे मळून घ्यावे पीठ छान एकत्र करून पोळीच्या पिठाप्रमाने गोळा तयार करणे,.नंतर त्यातील थोडे पेढ्याएव्हढा गोळा घेऊन गोल गोल छोट्या आकाराचे गोळे बनवावेत. गॅसवर एका पातेल्यात साखर बुडेल इतपतच पाणी टाकावे.५ते७ मिनिटे उकळून घ्यावा की जनेकरून तो पाक आपल्या हाताच्या बोटावर घेतला असता चिकटपणा जाणवला पाहिजे. अशाप्रकारे पाक तयार करा.नंतर कढईत तेल गरम करून गुलाब जामुनचे तयार केलेले गोळे तेलात हळुवारपणे सोडून मंद आचेवर छान रंग येईपर्यंत तळून घेणे. गरम गरम पाकात सोडणे. १ते२तासात गुलाब जामुन पाकात मूर्तील  हॉटेल सारखी लुसलुशीत गुलाब जाम तयार,,,
टिप्स: गुलाब जाम जर तेलात फुटत असल्यास थोडा रवा किंवा मैदा घालून थोडे मळून घेणे.





#gulab jamun #gulab jamun recipe #gulab jamun recipe in marathi # गुलाब जामुन #gulab jamun video #gulab jamun kaise banate hai # gulab jamun marathi #gulab jamun atta #gulab jamun at home #gulab jamun banane ki recipe

Bharli Mirchi - भरली मिरची

                                            भरली मिरची









साहित्य:  हिरवी मिरची आकाराने थोडीसी मोठी १०ते१२, दाण्याचा कूट अर्धी वाटी ,१चमचा जिरेपूड, अर्धा चमचा, गरम मसाला,लाल तिखट अगदी थोडे, एक चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ फोडण्यासाठी जिरे व तेल.





कृती:  हिरव्या मिरचिला एका बाजूने सुरीच्या मदतीने  चीर पाडावी .वरील साहित्य म्हणजेच तेल व जीरे सोडून सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. तयार केलेले मिश्रण कापलेल्या मिरची मध्ये भरावे.कढईत १ते२ चमचा तेल टाकावे.तेल गरम झाल्यावर फोडणीला जिरे घालावे व नंतर मिश्रण भरून तयार केलेल्या मिरच्या तेलात भाजाव्यात व गॅस मंद आचेवर ठेवून 2 मिनीट कढईवर झाकण ठेवा. गॅस बंद करा तयार आहे तिखटपणा नसलेली भरलेली हिरवी मिरची

Thursday, 23 August 2018

Zatpat Sambar Wada - सांबर वडा












साहित्य: उडीद डाळ , जिरे ,मीठ,तळण्यासाठी तेल



कृती: दोन ते तीन तास डाळ भिजत घालावी भिजलेल्या डाळी तील  पुर्ण पाणी काढून टाकावे व मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यावी.नंतर त्या पेस्ट मध्ये १ चमचा जिरेपूड ,चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून ती पेस्ट एकदम हलकी म्हणजे  थोडी जाळीदार होते. गॅसवर तेल तापल्यावर हाताला पाणी लावून पेढ्याएव्हढे पीठ हातावर घेऊन मधोमध छिद्र पाडून वडा तेलात अगदी अलगद सोडून मंद आचेवर तळणे अश्याप्रकारे सर्व वडे तळून घेणे.मग काय झालेंन   
सांबर वडे तयार!

Katmirchi - Mirchi Pakoda - कटमीरची











साहित्य: बेसन,मीठ,चिंमुटभर खाण्याचा सोडा, हिरवीमिरची,तळण्यासाठी तेल.



कृती: सर्व प्रथम बेसनात मीठ व खाण्याचा सोडा घालून   
भजीच्या पिठपेक्षा थोडे घटट पीठ भिजवावे, नंतर मिरचीला एका बाजूने कापून घेणे,कापलेल्या मिरचीच्या मधोमध आपली बोटे धरून ती मिरची तयार केलेल्या बेसनाच्या पिठात बुडवून  गरम झालेल्या तेलात तळून घ्यावी. तळलेल्या मिरचीचे  चाकूच्या मदतीने दोन ते तीन काप करावे. कापलेले मिरचीचे तुकडे परत एकदा तळून घ्यावे.पूर्ण मिरची तळून झाल्यावर त्यावर आपल्या आवडीनुसार मीठ लालतिखट चाट मसाला टाकून अगदी चटपटीत खमंग अशी कट मिरची खाण्यासाठी तयार....एकदा करून बघाच नक्कीच आवडेल

Gajar cha Halwa गाजरचा हलवा -साधा अगदी सोपा असा गाजराचा हलवा










साहित्य: १किलो गाजर, ५००ग्राम साखर,२५०ग्राम,खवा२५०ग्राम, खोबऱ्याचा किस, विलायचीपूड आवडीनुसार काजू बदामाचे काप  १००ग्राम तूप,.


कृती:  सर्व प्रथम गाजर पाण्याने स्वच्छ धुवून घेणे.नंतर किसनी ने गाजराचा किस करून घेणे. कढईत तूप टाकून गाजराचा किस भाजून घेणे.अगोदर गाजराला पाणी सुटेन ते पूर्णपणे आटल्या नंतर त्यामध्ये साखर व खवा विलायचीपूड टाकून छान भाजून घेणे.वरून बदामाचे व काजूचे  काप टाकून सजावट करावी .साधा अगदी सोपा असा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार

tamatar cha thecha (टमाटरचा ठेचा)

साहित्य : हिरवी मिरची(१२), टमाटर(१), शेंगदाणे(५०                       ग्राम), कोथिंबीर, मीठ , जीरे , मोहरी,लसूण(७ते८ पाकळ्या)
कृती : प्रथम हिरवी मिरची तेलात भाजून घेणे त्यानंतर लसूण भाजून घेणे, तसेच शेंगदाणे पण भाजून घेणे
१ चमच तेलामध्ये टमाटर वाफवून घेणे
हे सर्व साहित्य जिरे कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे कुटून घेणे आणि त्यानंतर त्यात मीठ(चवी नुसार) टाकून व्यवस्थित एकत्र करून घेणे, त्यामध्ये जिरे मोहरी चा तडका देने
चविष्ट टमाटर ठेचा तयार

Wednesday, 22 August 2018