साहित्य: १ते २ वाटी शेवाळ्या, १ मीडियम साईजचा कांदा, ५ते६ हिरवी मिरची,४ते५ लसनाच्या पाकळ्या ,१/२चमचा हळद, १चमचा जिरेमोहरी, १५ ते२० (१/२)शेंगदाणे, कडीपत्ता, कोथिंबीर चवीनुसार मीठ व तेल.
कृती : सर्व प्रथम १ चमचा तेलात शेवळ्या साधारण भाजून घ्या.बाजूला काढून घ्या .नंतर त्याच कढईत तेल टाकून तेल तापल्यावर जिरेमोहरी टाका नंतर बारीक चिरलेला कांदा ,हिरवी मिरची,लसूण शेंगदाणे घालून भाजून घ्या. कडीपत्ता व आवडत असल्यास १छोटे बारीक कापलेले टमाटर घाला थोडे परतून दीड वाटी पाणी घाला त्यात हळद व मीठ घाला व पाणी उकळल्यावर त्यामध्ये भाजलेल्या शेवळ्या घाला पाच मिनिटे शिजू द्या. कोथिंबीर घाला तुम्हाला आवडत असल्यास सुके खोबरे घालून खायला द्यावे.
0 comments:
Post a Comment