साहित्य: 250ग्राम पोहे,१ते२ कांदे, ७ते८ हिरवी मिरची, आवडीनुसार शेंगदाणे, कडीपत्ता, कोथिंबीर,१चमचा जिरेमोहरी,2ते3 चमचा तेल १/२चमचा हळद ,किसलेले खोबरं चवीनुसार मीठ..
कृती: सर्वात अगोदर मीडियम पोहे स्वच्छ धुवून ठेवा. पोहे छान भिजे पर्यंत कांदा मिरची बारीक कापून घ्या. नंतर कढईमध्ये तेल गरम झाले असता त्यामध्ये जिरेमोहरी टाका. जिरेमोहरी तडतडल्यास कांदे घालावे.कांदे छान परतून घेऊन शेंगदाणे हिरवी मिरची घालून परतून कडीपत्ता घाला,सर्व चांगल्या प्रकारे भाजून घ्या गॅस कमी करून हळद व पोहे चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ४ते५ मिनिटे ठेवा, प्लेटमध्ये पोहे त्यावर कोथिंबीर व किसलेल खोबरं घाला. अगदी सहज तयार होणारे पोहे'''
0 comments:
Post a Comment