साहित्य: अगदी थोड्या सामग्री मध्ये होणारी आणि कोणालाही बनवता येणारी अशी चविष्ट भाजी .५00 ग्राम चिकन, सुहाना चिकन मसाला, अद्रक लसूण पेस्ट ,१चमचा लालतिखट, कोथिंबीर, २ते३ चमचा तेल लागेल
तरच मीठ घालावे कारण मसल्यामध्ये मीठ असते.बस्स आहे न थोडी सामग्री!
कृती: चिकनला लिंबू व मीठ लावून धुणे त्यामुळे चिकनचा वास येणार नाही.अगोदर सुहाना मसाला एक वाटी पाण्यात गुठळ्या न होता कालवून घेणे नंतर गरम तेलात अद्रक लसणाची पेस्ट टाकून परतून घ्या.गॅस कमी करून लालतिखट व सुहाणाचे मिश्रण घालून परतून घेणे. ग्रेव्हीसाठी थोडे पाणी घाणे. १०ते 15 मिनिटे झाकण ठेवून चिकनला शिजू देने अवघ्या १५ मिनिटात चिकन तयार वरतून कोथिंबीर टाकून झटपट चिकन तयार होईल. चवीला लागत असल्यास मीठ घालावे.
टिप्स: चिकन बॉयलारच हवे कारण ते पटकन शिजते.
0 comments:
Post a Comment