Saturday, 25 August 2018

Paneer biryani { पनीर बिर्याणी}







साहित्य: २५०ग्राम पनीर,२५० ग्राम बासमती तांदूळ ,२ते३ टमाटरची पेस्ट,  २ते४ लालसर तळलेले कांदे, २ते४  चमच अद्रक लसणाची पेस्ट, १०ते १२ हिरवी मिरची,२ते३ तेजपान,२विलायची, ४ते५ लवंग,२ते३ दालचिनी (कलमी), २ते३ चमच एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, १चमचा गरम मसाला, १ते२ चमचा धनेजिरेपूड,३ चमचा तूप, जवळपास ४ चमचा तेल,१ चमचा जिरे, १ चमचा लालतिखट ,१/२ चमचा हळद , बारीक चिरलेला कांदा ,चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर .



 कृती:  तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि गॅसवर पाणी ठेऊन त्यात लवंग विलायची तेजपान दालचिनी व चमचाभर तूप व मीठ घालून ५ते७ मिनिटे तांदूळ अर्धवट शिजवून घेऊन त्यातील जास्तीचे  सर्व पाणी भातातून चाळणीच्या मदतीने काढून घ्यावे.आणि एका ताटात भात टाकून पंख्याखाली थंड करावे. भात थंड होईपर्यंत गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे    घालून नंतर चिरलेला कांदा घालुन लालसर परतवून त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून छान परतावे.नंतर गॅस कमी करून त्यात लालतिखट, धनेजिरेपूड, हळद टमाटरची पेस्ट टाकावी पाच मिनिटं छान परतवून गरम मसाला व बिर्यानी मसाला घालावा थोडे परतून अगदी थोडे पाणी घालून मिक्स करा दोन मिनिटं परतवून अर्धी वाटी पाणी घालावे.आणि मीठ घालुन पनीरचे तुकडे टाकून पाच मिनिटं शिजवुन घ्या व गॅस बंद करा.
आता दम बर्यानी लावण्यासाठी एक पातेलं घ्या .प्रथम पातेल्यात बनवलेले अर्धे पनीरचे मिश्रण व्यवस्थीत पसरून घेणे नंतर त्यावर थंड झालेला भात पसरवून घ्या भातावर तळलेले कांदे ,मिरची,कोथिंबीर व्यवस्थित   पसरवून घ्या .त्यानंतर अर्धे राहिलेले पनीरचे मिश्रण त्यावर भाताचे मिश्रण त्यावर कांदा, मिरची ,कोथिंबीर पसरवावी अगदी शेवटी दोन तीन चमच तूप घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. झाकन पोळीचे पीठ लावून (कणिक)बंद करावे किंवा झाकणावर जड वस्तू ठेऊन बंद करून     घेणे गॅस एकदम कमी करून बिर्याणीचे पातेले १० ते१५ मिनिटे ठेवून गॅस बंद करा.



 #Biryani #paneer Biryani # Veg Biryani #Dum Biryani #Hydrabadi Biryani #rice #Veg Pulaav #birayani recipe #Biryanikaisebanatehai #Biryani Video #paneerBiryaniInmarathi #Paneerbiryani Archana #paneer Biryani Recipe

0 comments:

Post a Comment