साहित्य: 200ग्राम पनीर ,१००ग्राम मटर,२मीडियम साईजचे कांदे ,२टमाटर,१इंच अद्रकचा तुकडा, ९ते१० लसूण पाकळ्या, २चमचा लाल तिखट,१चमचा जिरेपूड,१चमचा धणेपूड,१/२ चमचा हळद,४ते५चमचा सुहाना पनीर बटर मसाला, १चमचा जिरे , थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ,२ते३ चम्मच तेल.
.
कृती: प्रथम कांदा टमाटर अद्रक लसूण यांना गॅसवर कढईत तेल गरम करून थोडे भाजून घ्यावे व थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी . नंतर कढईत २ते३ चमचा तेल घेऊन जास्त आवडत असल्यास थोडे जास्त तेल घेणे. गरम तेलात जिरे घालून गॅस कमी करून लाल तिखट,धनेजिरे पावडर हळद घातल्यावर कांदा टमाटर ची पेस्ट घालून ५ मिनिटे छान परतून घेणे.त्यानंतर सुहाना पनींर बटर मसाला घालावा नंतर अगदी थोडे पाणी घालून ५ते6 मिनिटे परतून घ्यावे. मटर व पनीरचे काप करून घालावेत व आपणास आवडेल असी ग्रेव्हीत पाणी घालून मीठ घालावे व आवडत असल्यास मलई २ चमचा घातल्यास भाजीची चव मस्त लागते.बस्स ७ते८ मिनिटे कमी गॅसवर भाजीला ठेऊन द्यावे. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी. हॉटेल मधल्यासारखी टेस्टी मटर पनीर तयार आहे. तुम्ही ही भाजी खाल्यास हॉटेलची जिभेवर चव नक्कीच येणार बस्स मग काय बनवणार न ही भाजी एकवेळ जरूर ट्राय करा.
टिप्स: ग्रेव्हीचे प्रमाण जास्त पाहिजे असल्यास ७ते८ काजू कांदा व टमाटरच्या पेस्टमध्ये घालावे.
#mutter panner recipe in marathi #mutter paneer #mutter paneer masala Recipe #mutter paneer dhba style #mutter paneer paratha #mutter paneer pulao #mutter paneer recipe in marathi video #
#mutter panner recipe in marathi #mutter paneer #mutter paneer masala Recipe #mutter paneer dhba style #mutter paneer paratha #mutter paneer pulao #mutter paneer recipe in marathi video #
0 comments:
Post a Comment