Sunday, 16 September 2018

Idli chatani ( इडली चटणी )







साहित्य :  १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी दाळवे ,४ ते५ हिरवी मिरची,  २ते४बदाम ,१ चमचा जिरेमोहरी, कढीपत्ता, चवीनुसार मीठ.


कृती : शेंगदाणे थोड्या तेलात  छान भाजून घेणे .थंड झाल्यावर मिक्सरमध्ये शेंगदाणे व दाळवे आणि बदाम  थोडे बारीक करून नंतर त्यामध्ये पाणी घालून एकदम मस्त बारीक पेस्ट तयार करून घ्या.  पातेल्यात शेंगदाण्याची पेस्ट काढा . तूम्हाला चटणी जशी हवी तसे पाणी घाला म्हणजे घट्ट पाहिजे असल्यास कमी पाणी पातळ हवी असल्यास जास्त पाणी घाला नंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. आता तडका तयार करूया  गॅसवर एका पातेल्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून तडतडल्यावर गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्ता टाका.  हिरवी मिरची भाजून झाल्यावर शेंगदाण्याच्या मिश्रणात तडका टाकून छान मिक्स करा.

Vitaminyukt moogache dose (पौष्टीक हिरव्या मुगाचे डोसे )





साहित्य: २ वाट्या हिरवेमुग, १ वाटी तांदूळ, १ कांदा, ३ते ४ हिरवी मिरची, ५ते ६लसूण पाकळ्या, ४ ते ५ कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर.


कृती: हिरवेमुग व तांदूळ  पाच ते सहा तास पाण्यात भिजत घालावे. पाच ते सहा तासानंतर त्यातील पाणी पूर्ण काढून टाकावे. आणि मिक्सर मध्ये मूग व तांदळाची मऊसर पेस्ट करून घ्यावी. मग कांदा, मिरची,लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घ्या. किंवा तुम्ही मूग व तांदळा सोबतच मिक्सरमध्ये बारीक करू शकता. नंतर त्यात चवीनुसार मीठ  व थोडे पाणी घालून डोश्याप्रमाणे मिश्रण तयार करावे. गॅस चालू करून नॉनस्टिकी तव्यावर डोस्याप्रमाणे  दोषे करून घ्या . एरवी लहान मुलांसोबत मोठेही कढीपत्ता कांदा कोथिंबीर हे खात नाहीत पण असे केल्यामुळे सर्व खाल्ल्या जाते आणि हिरवेमुग तर शरीराला पौष्टीक आहेतच मग आहेत न पौष्टीक डोसे चला मग पहा तर करून हे डोसे सॉस चटणी, नाहीतर आपली इडलीची शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता.

Saturday, 15 September 2018

School tiffin in only five minit ( पाच मिनिटात मुलांचा डब्बा नमकीन वाटाणे )






साहित्य:  २ वाट्या वाटाणे, १ चमचा जिरे मोहरी, २ टेबल स्पून तेल,१/२ चमचा हळद, 


कृती: वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले.  गॅस चालू करून कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून चांगली तडतडल्यावर भिजवलेले वाटाणे घाला नंतर हळद चवीनुसार मीठ घालावे. अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या काढाव्यात. कुकरची वाफ गेल्यावर कुकर उघडा जर थोडे पाणी असेल तर कुकरचे झाकण न लावता पाणी आटवून घ्या .जर पाणी नसेल तर उत्तमच बस्स टिफिन रेडी अगदी मुलांना तयार करतच तुम्ही बनवू शकता फक्त फोडणी घातली की झाले काम.

Home made shrikhand (घरगुती श्रीखंड )







साहित्य: १/२ लिटर दही( चक्का दही), १ वाटी  पिठी साखर,  विलायचीपूड,  आवडीनुसार काजू,बदाम, पिस्ता,
 
कृती:  दही एका कॉटनच्या कपड्यात पोटली बांधून रात्रभर टांगून ठेवा. त्यामुळे दह्यातील सर्व पाणी निघून जाईल. मग तयार झालेला दह्याचा गोळा  व पिठी साखर वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये पाच ते सहा मिनिटे फिरून  घ्या. तुम्हाला काजू, बदाम ,पिस्ता बारीक कापून आवडत असल्यास बारीक कापून किंवा मिक्सरमधून बारीक करून टाका छान मिक्स करून हवा बंद डब्ब्यात काढून चार पाच तास फ्रिजमध्ये थंड ( घट्ट ) होण्यासाठी ठेवा. थंडगार श्रीखंड तयार खूप छान अगदी बाहेरच्या श्रीखंड सारखीच चव लागते बाहेरून आणलेले मोजकेच खावे लागते. पण आपण घरी बनवलेले मनसोक्त खाऊ शकतो.
टिप्स: साखर आपल्या आवडीनुसार घाला पण जास्त घातल्यास श्रीखंड पातळ होण्याची भीती असते म्हणून पाणी काढून जेवढा दह्याचा गोळा असेल तेवढीच साखर घेणे.

#shrikhand recipe in marathi #shrikhand recipe #amul Shrikhand #chitle shrikhand

Friday, 14 September 2018

Instant ganpaticha prasad( अगदी काही मिनिटात तयार होणार प्रसाद)






साहित्य: २ वाट्या खवा, २ वाट्या साखर, ३ वाट्या खोबऱ्याचा किस, वेलचीपूड. बस्स एवढेच.


कृती: गॅसवर कढईत खवा टाकून थोडा परतून घ्या .मग त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून मिक्स करावे चमच्याने सतत हलवत रहावे. नंतर साखर व वेलचीपूड घालून पाच ते दहा मिनिटे भाजून घ्या. आणि गॅस बंद करू प्रसाद एका भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली काजू  बदामाचे काप भुरभरावे अगदी कमी वेळात टेस्टी असा प्रसाद तयार होईल.आणि तुमचा वेळ पण वाचेल.

QUick paneer 65 ( दहा मिनिटात बनवा पनीर६५)








 साहित्य: २५० ग्राम पनीर, २ते३ चमचा मैदा, चिंग मचूनरीयन मसाला १ पाकीट, तेल ,२ ते३ लसणाच्या पाकळ्या, १/२इंच अद्रक, २ते ३ हिरवी मिरची.

 कृती:  पनीरचे सारख्या आकाराचे तुकडे करून घ्या,त्यावर मैदा टाकून मिक्स करून घ्या .मैदा प्रत्येक पनीरचे तुकड्याला लागला पाहिजे.गॅसवर कढईत तेल तापवायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे घालून तळून घ्या.नंतर  एका वाटीत चिंग मंचुरीयन मसाल्याचे थोडे पाणी टाकून मिश्रण तयार करा. दुसऱ्या एका पातेल्यात दोन चमचे तेल घालून लसन,अद्रक,हिरवी मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे टाकून परतून घेऊन त्यामध्ये चिंग मंचुरीयन चे मिश्रण घालून गॅस कमी करा ते मिश्रण घट्ट होत आले की त्यामध्ये पनीरचे तळलेले तुकडे टाका आणि चांगले मिक्स करून घ्या.गरमागरम पनीर ६५ तयार होतील.
टिप्स: एका  छोट्या कॅरीब्याग मध्ये मैदा टाकून पनीरचे  तुकडे टाकून छान हलून घेतल्यास पनीरच्या प्रत्येक तुकड्याला मैदा बरोबर लागतो.

#paneer recipes  #paneer 65 #panner chilli recipe in marathi #panner chilli #paneer #ching paneer chilli

Wednesday, 12 September 2018

Ganpati bappachya avdiche modak ( तळलेले मोदक )





सारणाचे साहित्य:  १ ओला  नारळ किसून घेतलेला, ( जवळपास दोन वाट्या नारळाचा किस ), १ वाटी साखर, १ वाटी खवा, विलायची पूड,आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता 

पारीचे साहित्य: १ वाटी गव्हचे पीठ, १ वाटी मैदा, २ ते ३ चमचा तूप, चमूटभर मीठ.

कृती:  अगोदर सारण बनून घेऊया.त्यासाठी गॅसवर कढईत नारळाचा किस,खवा,साखर,वेलचीपूड काजू, बदाम, पिस्ता, मनुका टाकून बारीक गॅसवर छान भाजून घ्या. जोपर्यंत पातळ झालेली साखर कोरडी होत नाही तोपर्यंत भाजा.गॅस बंद करून सारण थंड होऊ दया.
आत्ता पारीचे पीठ मळून घेऊ या अगोदर एका ताटात गव्हाचे पीठ, मैदा, मीठ एकत्र करून घ्या व  त्यात तूप कडकडीत गरम करून घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पाच मिनिटानंतर पेढ्याएव्हढे गोळे करून पुरी सारखी पारी लाटून घ्या. पारी हातावर घेऊन  चमच्याने सारण भरून हुळू हळू वरच्या बाजूने पारीचे तोंड बंद करा. अश्याप्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावे. आणि मंद (बारीक)  आचेवर( गॅसवर) तळून घ्या.बारीक गॅसवर तळल्यामुळे मोदक आतपर्यंत तळल्या जातील बस्स मोदक तयार झालेली आहेत.
टिप्स: पिठात गरम तूप घातल्यामुळे मोदक खुसखुशीत होतील.

#मोदक रेसिपी #Modak Recipes #मोदक रेसिपी मराठी #modak Recipe marathi #मोदकाचे प्रकार# ganesh modak recipe