Thursday, 27 September 2018

Easy omlet ( सोपे ऑम्लेट )




साहित्य : २ अंडी ,१/२ टीस्पून लालतिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, तेल.


कृती : तवा गॅसवर ठेऊन गॅस पेटवून घ्या.तवा  गरम होईपर्यन्त एका वाटीत एक चमचा पाणी घ्या त्यात लालतिखट हळद व चविनुसार मीठ घालून मिक्स करा नंतर अंडी फोडून टाका व फेटून घ्या .तव्यावर तेल टाकुन फेटलेले अंड्याचे मिश्रण तेलावर पसरून टाका.खालची बाजू भाजली की ऑम्लेट पलटून घ्या.बस्स पाच मिनिटात ऑम्लेट तयार होईल.हे ऑम्लेट लहान मुलांना खुप आवडेल कारण ह्यात कांदा मिरची असे  मुलांना न आवडणारे काहीच नाही.टेस्टी व चवपन चांगली लागते.
टिप्स : अंडी फेटण्या अगोदर पाणी टाकल्यास चटणी मीठ ऑम्लेटला यवस्थित लागते गुठळ्या होत नाहीत.

Home made mutton sukka ( घरगुती मटण सुक्का )



साहित्य :  ५००ग्राम मटण, १ कांदा  बारीक चिरलेला, अद्रक लसणाची पेस्ट २ चमचा, १ चमचा लालतिखट,१/२ चमचा हळद, १ चमचा काळा मसाला, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा जिरेपूड, १ चमचा गरम मसाला, १ ते २ चमचा भाजून कुटलेला खोबरा, असेल तर  तंदुरी मसाला १ चमचा, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल.


कृती :  सर्वात अगोदर मटण  लिंबू व मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या. नंतर गॅसवर कढईत तेल घालून अद्रक लसणाची पेस्ट घालून फोडणी करून त्यात मटण टाका नंतर हळद व मीठ घाला आणि पाणी घालून मटण नरम शिजवुन घ्या.त्यानंतर शिजलेल्या मटणामधील पाणी  काढून घ्या. हे पाणी ग्रेव्हीसाठी उपयोगात आणले जाते. या नंतर दुसऱ्या कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे नंतर कांदा घालून परतावे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाका. गॅस  कमी करून लालतिखट, हळद,काळा मसाला,, बारीक  केलेला खोबरा, गरम मसाला धणेपूड, जिरेपूड,तंदुरी मसाला घाला मिक्स करा  नंतर मटण घाला चवीनुसार मीठ  व कोथिंबीर घाला.छान परतवून घ्या. बस्स झालं तयार मटण सुक्का मस्त टेस्टी लागते एकदा तरी करून पाहा.

Thursday, 20 September 2018

Two in one chana dal ( चणा डाळ )





साहित्य:  ५ ते ६ भिजत घालेली चणा डाळ,१ टमाटर, १ कांदा, १ ते २ चमचा लसूण कोथिंबीर जिरे एकत्र कूटलेले ,कढीपत्ता, १  चमचा लालतिखट, १/२ चमचा हळद,  १चमचा  धणेपूड ,१ चमचा जिरेपूड,१ चमचा काळा मसाला , १  चमचा जिरेमोहरी, चवीनुसार मीठ, व तेल.

कृती : गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरेमोहरी टाकून तडतडू द्या.नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. नंतर लसणाची  पेस्ट व कढीपत्ता टाकून परतून घ्यावे गॅस कमी करून लालतिखट, हळद, बारीक चिरलेला टमाटर घाला. छान परतवून घ्या.त्यानंतर भिजलेली चणा डाळ घाला नंतर धणेपूड, जिरेपूड, काळा मसाला चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. डाळ बुडेपर्यंत पाणी घालून शिजू द्यावे. पूर्ण पाणी    आटेपर्यंत शिजवुन घ्या.ही डाळ एकदम नरम शिजवायची नाही.वरतून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. ही डाळ आपण नवरात्री मध्ये प्रसाद म्हणून करू शकतो. आणि भाजी म्हणून पण खाऊ शकतो.म्हणून हिला मी two in one डाळ म्हणते तर तूम्ही काय  म्हणाल!

Tuesday, 18 September 2018

Veg Party Starter Potato Lollipop( पोटॅटो लॉलीपॉप )







साहित्य : उकडून कुस्करलेले २ आलू, १ मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा , १/२ कप ब्रेड क्रम्स,  १छोटा चमचा लालतिखट, १ चमचा धणेपूड, १ चमचा अद्रक लसन पेस्ट, १/२ चमचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मैदा १ ते २ चमचा लॉलीपॉप  बुडून तळण्यासाठी, तेल तळण्यासाठी .



कृती : आलू, ब्रेड क्रम्स,लालतिखट, धणेपूड, कांदा, अदरक लसन पेस्ट, आमचूर पावडर,कोथिंबीर,चवीनुसार मीठ घालून मिक्स करून गोळा बनवून बाजूला ठेवून द्या. एका वाटीत मैदा घेऊन थोडे पाणी घालून  पातळ पेस्ट करून घ्या. नंतर हाताला तेल लावून  आलूच्या मिश्रणाचा गोळा घेऊन गुलाब जामून
सारखे गोळे बनवून घ्या.गॅसवर तेल गरम करून त्यात बनवलेले गोळे मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळून हातावर घेऊन गोल आकार देने की जणेकरून ब्रेड क्रम्स निघणार नाहीत .अश्याप्रकारे एक एक गोळा बनून तेलात सोडा. आणि सोनेरी रंगावर तळून घ्या. व मेओनीज किंवा टमाटो सॉस सोबत स्टार्टटर म्हणून सर्व्ह करा .टेस्टी पोटॅटो लॉलीपॉप  तयार  आहेत.

Cheesy Potato smiley (बटाट्याच्या स्मायली)





साहित्य: ३ उकडलेले आलू,  २ ब्रेड  , कॉर्न फ्लॉवर ३ मोठे चमचा, २५ ग्राम चीज ( १ तुकडा) , चवीनुसार मीठ ,तळण्यासाठी तेल. 


कृती:   ब्रेडची काठ ( कडा)काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.एका टोपल्यात ब्रेडचा चुरा व चिज किसून टाका चीज जास्त टाकू नका जास्त टाकल्यास तेलात  वितळू शकते नंतर किसलेले आलू टाका . कॉर्न फ्लॉवर चवीनुसार मिठ टाका मिक्स करून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर काळीमिरी पावडर टाकू शकता. पण मुलांसाठी असेच छान लागते. नंतर एक प्लेट घेऊन त्यात एक चमचा तेल टाकून तयार केलेले आलूचे मिश्रण एकजीव करावे. मळलेले आलूचे मिश्रण हवा बंद डब्यात ठेऊन पंधरा ते वीस मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. पंधरा ते वीस मिनिटानंतर   ताटावर एका पॉलिथिनवर तयार केलेल्या  मिश्रणामधून अर्ध्या  गोळा ठेऊन त्यावर अजून एक पॉलिथिन ठेवा आणि लाटण्याच्या मदतीने जाडसर  मोठी पोळी लाटून घ्या. वरची पॉलिथिन काढून टाका व पाणी पुरी सारख्या पुऱ्या कटरच्या मदतीने पाडून घ्या.नंतर त्या पुरीला स्मायली चेहरा तयार करा. तयार झालेल्या स्मायली पुऱ्या एका प्लेटवर काढून वीस मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात एक एक करून स्मायली पुरी टाका आणि मीडियम गॅसवर तळून घ्या. पुऱ्या तळतेवेळलेस एकमेकांना चिटकणार नाही म्हणून काटा चमचे अधून मधून हलवत राहा. साधारण तपकिरी रंग येई पर्यंत तळून घ्या.


टिप्स: स्मायलीज पुरी हवा बंद डब्यात ठेऊन. जेंव्हा तुम्हाला पाहिजे तेंव्हा तळून घ्या. तुमचा वेळ वाचेल आणि स्मायलीज झटपट बनतील.

Monday, 17 September 2018

Kakdiche dhapate ( काकडीचे धपाटे )



साहित्य : २ वाट्या बेसन, १ वाटी गव्हाचे  पीठ, १/२ वाटी ज्वारीचे पीठ, १ किसलेली काकडी,   २ चमचा लसणाची पेस्ट, १चमच लालतिखट, १/२चम्मच हळद, १ चमचा  जिरेपूड, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ व तेल.

कृती : बेसनात गव्हाचे  पीठ, ज्वारीचे पीठ ,किसलेली काकडी, लसणाची पेस्ट, लालतिखट, हळद,जिरेपूड मीठ, कोथिंबीर २ चमचा तेल टाकून मिक्स करा. नंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. चपाती प्रमाणे धपाटे लाटून घ्या. गॅस चालू करून तवा ठेवा व धपाटे तेल लावून छान भाजून घ्या. धपाटे दही,सॉस,चटणी, कशाही सोबत छान लागतात.

Easy Coconut chatni ( सोपी ओल्या नारळाची चटणी )






साहित्य : १ नारळ किसून घेतलेला, १ वाटी दही ( दही जास्त आंबट नको )  ४ते५ हिरवी मिरची, फोडणीसाठी जिरेमोहरी ,कढीपत्ता, तेल व चवीप्रमाणे मीठ.


कृती :  किसलेला ओला नारळ एका भांड्यात घेऊन त्यामध्ये व मीठ मिक्स करावे. नंतर फोडणीसाठी गॅस चालू करून पातेल्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर जिरेमोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरचीचे तुकडे टाका व कढीपत्ता टाका मिरची  व गॅस बंद करून तयार झालेली फोडणी  नारळाच्या मिश्रणात टाका . नारळाची चटणी तयार कोशिंबीर पेक्षाही ही चटणी बनवायला वेळ कमी लागतो. फक्त नारळ अगोदर किसून ठेवावा.

टिप्स: नारळ फोडून  फ्रिजमध्ये ठेवल्याने खोबरं हे नारळाच्या कवटी पासून वेगळे करण्यास सोपे जाते.